edited_image.png

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
१/९/२५

✨ निरोप ✨

“आपली बदली नाशिकला झाली आहे” … रोहितचे शब्द ऐकताक्षणी नेहाच्या मनात क्षणभर आनंद दाटून आला. पण लगेचच वास्तव उमटलं…हे घर, ही माणसं, या गल्ल्या… सगळं मागे सोडावं लागेल!

सामान बांधता बांधता आठवणींच्या गाठी बांधल्या जाऊ लागल्या. शेजाऱ्यांचा निरोप घेणं जड जात होतं, पण मनात जाणवत होतं…
“ही आपुलकीच आयुष्यभराची शिदोरी आहे, ती मी जपून ठेवेन!”

निघायची वेळ जवळ आली. घर रिकामं झालं, पण भिंती कहाण्या सांगत उभ्या होत्या.
रोहित म्हणाला, “चल, कुलूप लावूया.”
आणि नेहाचा हुंदका फुटला.

ती भिंतीवर हात फिरवत फिरवत देवघरातील रिकाम्या कोपऱ्या जवळ थबकली. हात जोडून घराशी संवाद साधू लागली…
“तुझा निरोप कसा घेऊ? तू माझ्या श्वासांत आहेस.
किती आठवणी, किती स्वप्नं तुझ्या साक्षीने जगले, ती कशी विसरू? कशा ह्या आठवणी तुझ्या तून वेगळ्या करु?
हा निरोप मला नकोच… तो असाच अर्धवट राहू दे.”

दाराला कुलूप लागलं, पण आठवणींचं दार मात्र उघडंच राहिलं…

शब्दसंख्या: १५०
सौ सीमा अशोककुमार कुलकर्णी.

414 Comments

  1. Hello mates,
    if you are interested in a fresh online casino,
    I can recommend some amazing options.

    These casinos have promo offers,
    quick withdrawals, and a huge choice of games.

    See it for yourself https://mj96.click

    Best of luck )

  2. Hello guys,
    if you are interested in a new betting site,
    I can suggest some amazing options.

    These sites have promo offers,
    secure payments, and many slots and tables.

    See it for yourself https://

    Wishing you wins )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!