ट्रेन, स्टेशन, रूमाल, नजर, पाऊस हे शब्द वापरून अलक (१०/९/२५)
……. देवमाणूस ……..
जोरदार पाऊस पडत होता, रूळावर पाणी साचले होते. सर्व ट्रेनस् होत्या तिथेच थांबल्या होत्या. तिची ट्रेन स्टेशन पासून खूप लांब थांबली होती. तिने नजरेने साचलेल्या पाण्याचा अंदाज घेतला व ती खाली उतरत असताना तिचा तोल जाणार तेवढ्यात त्याने तिला सावरले. दाराच्या पत्र्याने तिच्या हाताला जखम झाली, रक्त येत होते, त्याने खिशातून रूमाल काढून तो जखमेवर बांधला. तिचा हात धरून त्याने तिला सुरक्षित जागी सोडले व तो गर्दीत दिसेनासा झाला.


👍🏻👌🏿
👌👌