#माझ्यातलीमी
#विकेंड टास्क
#रसग्रहण
भिजलेल्या क्षणांना
आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले
हळवे मन अन कांति
भिजलेल्या क्षणांना
आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले
हळवे मन अन कांति
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले
कांदे पोहे
हे गाणे ऐकले की मन एकदम गुंग होऊन जाते. कांदेपोहे आणि आयुष्य यांच्यातील साम्य अगदी योग्य ठिकाणी चपखलपणे शब्द बसवून गाणे तयार केलेले आहे. नवऱ्यामुलीच्या मनाची व्यथा सुरेख शब्दात मांडून तिचे भावविश्व कसे समाजाला सांगता येईल यासाठी अचूक वर्णन केले आहे. लग्न जुळवताना लगेच लग्न जुळले तर ठीक नाहीतर अनेक अडथळ्यांना मुलीला कसे सामोरे जावे लागते आणि तिच्या मनाची अवस्था यांची सांगड येथे साधण्यात आली आहे. त्यामुळे मला हे गाणे चाल, शब्दबद्धता आणि अर्थपूर्णता यासाठी आवडते.
अनन्या अनुप सरदेसाई

खूप छान
मस्तच
अजून थोडे मोठे लिहा
छान