#माझ्यातली मी
# वीकेंड टास्क २६-१२-२५
ब्लॅाग लेखन
*गुड बाय २०२५*
गत वर्षाला करूया गुडबाय ,
नव वर्षाला करूया हाय,
पण नित्य स्मरूया भारत माय,
नाहीतर या जन्माचा उपयोग काय?
आलेला दिवस ,महिना तसेच वर्षही कधीतरी जाणार आहेच , त्यामुळे जगरहाटीनुसार नव्यांचे स्वागत करायला हवेच पण गत
वर्षाचा मागोवा घेताना त्यातील चांगल्या व नकोशा सर्व गोष्टींचा
विचार करावा लागेल.
चांगल्या गोष्टीत महत्वाचे म्हणजे क्रिकेट मध्ये महिलांनी वन डे वर्ल्ड कप जिंकला तो दिवस ,तसेच नवी मुंबई येथे सुरू झालेले अद्ययावत्
एअरपोर्ट , मुंबईत आरेकॅालनी ते कफ परेड मेट्रो सुरू झाली . तसेच आपल्या संभाजी महाराजांच्या जीवनावरील *छावा* व अजित डोवाल यांच्यावरील **धुरंधर ** या
गाजलेल्या चित्रपटामुळे लोकांना
आपल्या इतिहासाची व राजकारणाची चांगली ओळख करून दिली.
महत्वाचे म्हणजे आपले पंतप्रधान
श्री मोदी करीत असलेले भारताच्या विकासाची व आपले मुख्यमंत्री श्री
देवेंद्र फडणवीस करीत असलेली
महाराष्ट्रातील विकासाची कामे दोन्ही प्रशंसनीय आहेत.
घरगुती बाबीचा विचार केल्यास
कोणत्याही घरगुती सामानाची गरज
भासल्यास ती ब्लिंकिटवर मोबाईल वरून पाठवल्यास १०व्या मिनिटाच्या आत हजर असते
Al ने तर असा सुळसुळाट केला
आहे की भासमान काय व खरे काय हेच कळेनासे झालं आहे .
तसेच तंत्रज्ञानानेही प्रचंड प्रगती केली.
वाईट गोष्टींमध्ये दहशत वाद्यांनी
केलेला पहेलगाम वरील हल्ला हा होय . व यालाच प्रत्युत्तर म्हणून
आपल्या पंतप्रधान मोदींनी **ॲापरेशन सिंदूर*घडवून आणले.
व हम भी कुछ कम नही हे सिद्ध केले.
हानिकारक गोष्टींमध्ये अनेक ठिकाणी आलेले महापूर व त्यामुळे
विस्कळीत झालेले जनजीवन यांचा समावेश होतो .तसेच नेहमीच होणारे अपघात ,अत्याचार यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या यांचाही विचार करावा लागेल.
अशावेळी मला गाण्याच्या ओळी
आठवतात ,
“ भले बुरे जे घडून गेले , विसरून जाऊ सारे आपण , जरा विसावू
या वळणावर “॥
मला यात थोडा फरक करावा वाटतो की वाईट गोष्टी विसरल्या तरी त्यापासून बोध घेऊन व अनुभव समजून सुधारण्याचे प्रयत्न करूया व चांगल्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने कशा साध्य करता येतील हे पाहावे लागेल.
आता नवीन वर्षाचे म्हणजेच जानेवारी २०२६ चे स्वागत आनंदात ,उत्साहात व जल्लोषात
करूया व म्हणूया ,
उल्हासाचे रंग भरले , नभांतरी दश -दिशांतरी ॥
सौ . अनुराधा भोगले
