#माझ्यातलीमी #लघुकथालेखन टास्क (२/३/२६)

#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क(२/३/२६)
#टास्क_साठी_ब्लाॅग_लेखन
#सण_साजरे_करताना_अन्न_वाया_जाण्याची_जाणीव
सणवार साजरे करताना, घरात किती पदार्थ बनवले जातात हे आपण कधी मोजले आहे का? इतके पदार्थ बनवले जातात कधी सर्व संपत नाहीत. कधी ताटात जास्त वाढून घेऊन संपवले जातात, तर कधी वाया गेलेले अन्न डस्टबिनमध्ये जाते. हे पाहिले की कसे वाटते? कधी विचार केला का?
मागच्या वर्षी होळीला गावी जाऊ शकलो नाही. म्हटलं, इथेच सण साजरा करूया. दहा-बारा पुरणपोळ्या झाल्या, पण त्या संपल्या नाहीत. घरात फक्त चार माणसे. मिस्टरांना कामानिमित्त बाहेर गावी जावे लागले. मुलांना मित्र-मैत्रिणींसोबत होळी एन्जॉय करायची होती, आणि त्यांना पुरणपोळीपेक्षा पिझ्झा-बर्गर खाण्यात मजा वाटते.
गावी असतो तर दहा-बारा ऐवजी वीस-पंचवीस पोळ्या कधी संपल्या असत्या, हे कळलेच नसते. मग मी विचार केला – चार-पाच दिवस पुरणपोळ्या खाण्यापेक्षा… सर्व पोळ्या सिल्व्हर फॉइलमध्ये पॅक केल्या. गाडी काढली, सिग्नल स्टॉपवर गेले. सिग्नल पडला तेव्हा लहान-लहान मुले फुगे, डस्टबिन पिशव्या विकायला गाडीजवळ आली. मी पॅक केलेल्या पुरणपोळ्या त्यांना वाटून टाकल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे स्मित आणि समाधान बघून या वर्षीची होळी सार्थकी लागली असं वाटलं.
कधी आपण विचार करूया बघा – भारतात दररोज लाखो लोक उपाशी झोपतात, तर दुसरीकडे सणासुदीला किती टन अन्न वाया जाते. खरं तर भूक काय असते, ते त्यांनाच समजते ज्यांना फक्त पाणी पिऊन राहावे लागते. किंवा काचेच्या कपाटात समोर वेगवेगळे पदार्थ मांडलेले असतात, पण फक्त नयनसुख घ्यावे लागते.
माझं म्हणणं – अन्न मिळतं म्हणून फेकून देणे किंवा वाया घालवण्यापेक्षा एकदा विचार करा. ती मुले, आजारी माणसे, ज्यांना कचऱ्यातून अन्न वेचून खावे लागते, त्यांना डोळ्यासमोर आणा. जर खरोखरच आपण भावना जाणवणारे असू, तर पुढच्या वेळी अन्न वाया जाण्याची चूक आपल्या हातून घडणार नाही.
#शब्द_संख्या_२६८
#०३_०३_२०२६_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

error: Content is protected !!