संस्कार

# माझ्यातली मी
# लघुकथा लेखन टास्क
दि. 3 मार्च 26

संस्कार
आज सुनबाईची पहिली होळी म्हणून ती गाववरुन पोहचता संध्याकाळ झाली. सुनबाईने पुजेचे ताट आणले अन बोलली …
चला आपण पुजा करुन येऊ
ताटातले पुरणाचे नैवेद्य, नारळ,गाठी पाहून तिने मुला सुनेला थाबंवल. सुनेला बोलली
पुजेला जाण्या आधी माझ ऐक बाळ
आमच्या आयुष्यातला प्रसंग …तुझे सासरे गेल्यानंतर खूप वाईट दिवस आलेत आधीच मोलमजुरीवरच पोट होत पण दिवस निभत होते. नतंर मात्र पोटापुरत मिळवत कठीण झाल .हा दहा वर्षाचा होता.होळीचा दिवस मजुरीचे पैसे मिळाल्यावर सामान आणून पुरणपोळी करेल अशी आशा दाखवून मजुरीला गेले. सणाचा दिवस म्हणून कुणीच पैसे दिले नाही, कुणी उधार पण देईना. अशात अवकाळी पाऊस सुरु झाला. कशीबशी घरात पोहचले तर पुरणपोळीच्या आशेने चिमणीच्या उजेडात अभ्यास करत असलेल लेकरु दिसल.
काळजात गलबलल काय ही जिदंगी लेकराला सणाला गोड घास नाही देऊ शकत
तशीच परत फिरले अन पाटलाच्या वाड्यात मागल्या दाराने पोहचले पोळीची भिकच मागितली. पाटलीनबाई मायमाऊली ती… जेवण झाली होती तरी दोन पोळ्या करुन दिल्या.कुणी पाहू नये म्हणून पदराखाली झाकल्या. पोटाला आतून भुकेचे चटके होते तर वरुन गरम पोळीचे. डोळ्यातल्या पाण्यासोबत लेकराला घास भरवले.
असे दिवस काढत ,परिस्थितीशी लढत तुझा नवरा सरकारी नौकरीत लागला .दिवस पालटले पण आठवणी मनात आहेत.तुझ्या ताटातले नैवेद्य पाहून वाटले पुजा करुन हे सर्व होळीत स्वाहा करण्यापेक्षा कुणाच्या तरी
पोटात गेले तर त्याचा आत्मा तृप्त होईल.

इतका वेळ आईचे बोलणे ऐकणाऱ्या मुलाला सुद्धा जुने दिवस आठवले डोळे भरुन आले .तो बायकोला बोलला….
यापुढे आपण घराच्या अंगणातच प्रतिकात्मक गोवऱ्याची छोटी होळी करत जावू…. .राग,वैर,अहंकाराची आहूती होळीला देत जावू अन हा गोड घास गरजवंताच्या मुखात घालू.आता पहिले फक्त पुजा करुन माझ्या सोबत चला.
रस्त्याने जातांना त्यांने काही मिठाई व गाठी खरेदी केली व आई अन बायकोला घेवून एका झोपडपट्टीत घेवून गेला. तिथे होळी पेटली होती. हातावर पडणाऱ्या प्रसादाच्या आशेने रेगांळणारी बालके होती .त्या सर्वांना मिठाई,गाठी वाटून दरवर्षी येथे येऊन पुरणपोळी वाटण्याचा निर्धार करुन ते पलटले. आपले संस्कार सफल झाल्याचे पाहून आईचे हदय भरुन आले.

©® विनया देशमुख
शब्द संख्या… 290

.

error: Content is protected !!