#माझ्यातलीमी

टास्क

दिलेल्या वाक्यावरून #कथा

“मी माझ्या बाळा साठी उभी राहते तर मी चुकीची ठरते?”

नयना तिच्या मित्र मैत्रिणी सोबत हट्टाने गड किल्ला बघायला गेली होती.सर्व जण हसत खेळत गप्पा करत किल्ला चढत होते.ऊन चढते होते त्यामुळे सारखी तहान लागत होती.नयना जवळचे बाटलीतील पाणी संपले होते,चढण चढल्या मुळे दम पण लागला होता.तहानेने घसा पण सुकला होता.आता तिला चढाव चढणे मुश्किल होत होते,त्यामुळे ती थांबत थांबत चढत होती.या सर्वात तिचा मैत्रिणीचा ग्रुप पुढे निघून गेला होता.ती थोडावेळ एका दगडावर बसली होती.तेवढ्यात खिदळत काही मुलांचे टोळके आले,एकाने विचारले काही मदत करू का,घसा सुकल्या मुळे तिला बोलवत नव्हते.आता ते टोळके पुढे गेले पण त्यातील एकाने तिच्यासाठी शिकंजी,सरबत आणले होते आणि ते पिण्यासाठी आग्रह धरला.हिने जास्त आढे वेढे न घेता सरबत घेतले,कारण घसा खूप सुकला होता.

इकडे सर्व मैत्रिणी तिला शोधत होत्या पण नयनाचा कुठे पत्ताच लागला नाही.शेवटी सर्वजन गड उतरले आणि पायथ्याशी थांबले.नयनाची वाट बघत.

२ तास होऊन गेले नयना शुद्धीत आली,डोळे उघडले तर ती एका झोपडीत होती.तिने पटकन उठायचा प्रयत्न केला पण ती उठू शकली नाही सार शरीर भर वेदना जाणवत होती,अंगावर कपडे सुद्धा नव्हते.आता तिला थोडे आठवू लागले….

त्या मुलाने सरबत देऊन डाव साधला होता.सरबतात गुंगीचे रसायन घालून तिला बेशुद्ध करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता.अत्याचार करून ती मुले निघून गेली होती तिला तसेच टाकून.

कासेबसे तिने स्वतःला सावरून आधी फोन शोधला,मैत्रिणीना सांगितले.

सर्वजण तिला शोधत तिथे पोहचले.

आता सर्वानच घरचे टेन्शन आले काय आणि कसे सांगावे?काय होईल घरी सांगितल्या वर?नयनाच्या घरच्यांनी तिची शारीरिक,मानसिक अवस्था बघून काय घडले असावे याची कल्पना केली.मोठे काका काकू,वडील,भाऊ यांनी संतापाने घर डोक्यावर घेतले,नयना व तिच्या आईला बोलू लागले,कारण आईनेच जाण्याची परवानगी दिली होती..

नयनाची अवस्था बघून तिला मेडिकल ट्रीटमेंट लवकरात लवकर देणे गरजेचे होते.नयनाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणे आईने तिचे कर्तव्य समजले.तिची आईने भावंडात कधीही भेदभाव केला नाही.मुलाइतके च मुलीने पण सक्षम राहावे अश्या मताची होती.त्या दृष्टीने ती नयनाला तयार करत असे.पण काळजी घेऊन सुद्धा नको ते घडले होते.

“समाजात काय तोंड दाखवू?आमची समाजात,गावात किती प्रतिष्ठा आहे?ती तू धुळीला मिळवली आहेस जा दुसरीकडे जाऊन तोंड काळे कर.”घरातील लोक चिडले होते.पण आई तिच्या बाळासाठी भक्कम पणे उभी राहिली तर ती चुकीची कशी ठरू शकते?आईने रीतसर पोलिस तक्रार केली,मेडिकल चेकअप केले.तिला शारीरिक दृष्ट्या आधी बरे होऊ दिले.सुदैवाने नयना ला पुढील प्रॉब्लम आला नाही.नयनाला तिने पोलिस ऑफिसर म्हणून प्र शिक्षण दिले.सोबत समजविले “सोबत कितीही लोक असले तरी आयुष्यातील खरा संघर्ष स्वतःला च करावा लागतो.स्वतःला घडवणारा कोणत्याही वादळात टिकून राहू शकतो.आज स्वतःला मजबूत केले तर कोणाच्या आधाराची गरज भासत नाही.”

स्त्री जेंव्हा जेंव्हा संघर्षासाठी उभी राहते तेव्हा ती भले पत्नी असेल पण जेव्हाही ती मुलांसाठी उभी राहते ती वाघीण असते,ते नातं आईच असत.

दरम्यान तिने पोलिस अधिकारी याना योग्य ते सहकार्य केले .ती सर्व मुले सापडली.फ़ास्ट ट्रैक कोर्ट मधे खटला दाखल केला आणि मुलाना जन्म ठेपेची शिक्षा झाली.आज नयना खंबीरपणे तिचे कर्तव्य पार पाडते आहे ते केवळ तिच्या आईच्या भक्कम साथी मुळे.

error: Content is protected !!