# कथालेखन टास्क.
(२४/२/२०२६)
पण मी माझ्या बाळासाठी उभी राहते, तर मी चुकीची ठरते?..
( लेखिका संगीता देवकर यांच्या रिवेंज या कथेतील ओळ. याला धरून लिहिलेली कथा)
कथेचे शीर्षक :- ” अजेय ढाल”
गावात वादळ घोंगावत होतं पण त्याहीपेक्षा मोठं वादळ विठ्ठल रावांच्या घरात होतं. त्यांचा पाच वर्षाचा नातू,” अंश” ऑप्टिझमसी झुंजत होता. तो इतर मुलांच्यासारखा बोलत नसे. स्वतःच्या धुंदीत चित्र विचित्र आकडेमोड, चित्रे काढी. हावभाव करी.
” हा वेडा आहे! याला घराबाहेर काढू नका नाहीतर घराची अब्रू जाईल” . विठ्ठल राव डाफरले. शेजारी तर कुजबूज करणारच. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच! अशा मुलाला वाढवून तरी काय फायदा. आईनेच त्याला बिघडवलं आहे.
अंश ला काही कळेना, तो घाबरला पण आईने मात्र प्रेमाने त्याला जवळ घेतलं. त्याला घेऊन ती थेट गावाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुख्याध्यापकांपुढे उभी राहिली.
मुख्याध्यापक म्हणाले,” वेड्या मुलांसाठी इथे जागा नाही”. ते जोरात ओरडून बोलले. तरीही मीरा ठामपणे उभीच राहिली. पाऊस पडू लागला. लोकं टिंगल करू लागले म्हणाले,” स्वतःचच हस करून घेते. तर कुणी किती हट्टी बाई आहे, तर कुणी तिला चुकीचं ठरवून मोकळे झाले.
मीराच्या मनात आले,” मी माझ्या बाळासाठी उभी राहिले तरी चुकीचीच ठरते. पण आज मी जर धैर्य दाखवलं नाही तर माझं बाळ कायमचे हरवून जाईल!” तिने हार मानली नाही. अंशाच्या चित्रांमधलं गणित ओळखलं. रात्रभर जागून कोडींग शिकवू लागली. जगाने तिला बहिष्कृत केलं तरीही अंश भोवती प्रेमाचं कवच अगदी घट्ट विणलं.
पंधरा वर्षानंतर इसरोच्या एका मोठ्या मोहिमेत” अंश”नावाच्या तरुण शास्त्रज्ञाने महत्त्वाचं गणित सोडवलं होतं. जेव्हा त्याचा सत्कार समारंभ झाला तेव्हा तो फक्त एकाच व्यक्तीकडे पाहून हसला…. ती होती मीरा!
आज गावकरी आणि तेच मुख्याध्यापक मिरवणुकीत सर्वात पुढे होते. मीरा मात्र लांब एका झाडाखाली उभी होती. तिला आज समजलं होतं-
जगाच्या नजरेतल तीच,” चुकीचं” ठरलं हे तिच्या बाळासाठी जगातील सर्वात मोठे अस्तित्व होतं.
शब्द संख्या:- २४६
सौ .स्मिता अनिल बोंद्रे.
©®
