मी का चुकीची ठरते …

#माझ्यातली मी
लघुकथा लेखन टास्क

श्वेता बाळाला छातीशी धरून घराबाहेर पडत होती , तितक्यात शेजाऱ्यांचे टोमणे तिच्या कानावर पडू लागले ,.. एकटी म्हणाली ,”नवरा जाऊन अजून महिना सुद्धा झाला नाही , आणि ही बाई नटून थटून ऑफिसला निघाली”, दुसरी म्हणाली,”असल्या बायकांना तर नुसतं घराबाहेर पडण्यासाठी कारण हवं असतं”, तिसरी म्हणाली , “हिला नवरा गेल्याच दुःख काहीच नाही का?”

त्यांच्या या बोलण्यावर श्वेता म्हणाली , ” अरे नवरा गेल्याचं दुःख मलाही आहे , पण दुःखाने माझ्या बाळाच पोट भरणार आहे का? दुःख करून घेऊन उपाशी मेले तर माझ्या या बाळाला उद्या कोण सांभाळणार आहे , तुम्ही सांभाळाल का ,? आता बोला ना , का बोलती बंद झाली , माझ्या बाळासाठी उभी राहतेय तर मी चुकीची ठरते का ? मग त्यावर आता एकच उपाय आहे , तुम्ही सर्वजण मला महिन्याचा खर्च देत चला , मी दुःख करत घरी बसेन ,,रोज नवऱ्याची आठवण काढून रोज रडेन मग तरी झालं.”
आणि तिच्या या वाक्यावर सारेच शांत झाले …

रूपाली मठपती ..

error: Content is protected !!