#माझ्यातलीमी
#लघुकथा_लेखन_टास्क(२३/२/२०२६)
#टास्कसाठी_लेख
पण मी माझ्या बाळासाठी उभी राहाते, तर मी चुकीची ठरते?
हा प्रश्न आईलाच पडू शकतो. कारण तिला आपल्या मुलाला एक आदर्श व्यक्ती म्हणून घडवायचे आहे. यासाठी तिला घरातल्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा असते. पण घरातल्यांना आईची भूमिका पटतच नाही.
त्यांचे म्हणणे असं की, ही कुठल्याही बाबतीत मुलाला पॅम्पर करते, म्हणजे पाठीशी घालते. त्याचा संघर्ष त्याला करू द्या; जगासमोर तो खंबीरपणे उभा राहायला शिकू द्या. आयुष्यभर का तू त्याला पुरणार आहेस? मग कशाला चूक असताना किंवा नसताना पाठीशी घालायचे? अशाने तो फुकट जाईल.
आईला मात्र असं वाटतं की, माझ्या मुलाला किंवा मुलीला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळालं पाहिजे. ती आपल्या मुलांमध्ये ‘हा मुलगा, ही मुलगी’ असा भेदभाव करत नाही. पण समाजाचं म्हणणं असं आहे की, मुलींनी जास्त शिकून काय करायचं? फक्त चूल-मुलं तर सांभाळायची. त्यासाठी का मोठी पदवी घ्यायला लागते?
आई मुलाच्या हितासाठी लढते, पण कुटुंब आणि समाज तिला स्वार्थी किंवा बंडखोर म्हणतो. आपल्या भारतीय संस्कृतीत आई आपल्या मुलांसाठी कुठल्याही परिस्थितीत सामोरी जाते; म्हणजे मुलांसाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करू शकते. जणू ती त्यागाची मूर्ती होऊन जाते.
खरंतर, आई आपल्या मुलांसाठी त्यांच्या पाठीशी उभी राहते. ती काही एकल माता पण असू शकते. अशा आईची समस्या तर वेगळीच असते. एकतर समाजातील लोक तिला नावे ठेवत असतात आणि दुसरीकडे मुलंही तिला समजून घेत नाहीत.
खरं तर, आईची भूमिका चुकीची नाही; ती आवश्यक आहे. काही वेळा समाजाने बदलणे गरजेचे आहे.
शब्द संख्या २३०
#२३_०२_२०२६_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.
