#माझ्यातली मी
#लघुकथा टास्क.
#शब्दांच महाभारत
सीतेच्या मौनाच्या रामायणात शब्दांना जागाच नव्हती..,…. , तेव्हा सोसण्याचा प्रश्न आणि कृष्णाची गरज अशा प्रकारचे प्रश्न कधी उद्भवलेच नव्हते . कारण सीतेच्या पाठीशी श्रीराम उभे होते . तिच्या प्रत्येक पावलावर लक्ष्मण सज्ज होते , त्यामुळे तिला जगाची परवा नव्हती .
पण आज आपल्याला प्रत्येक पावलावर आपल्या पाठीशी कृष्ण हवा असतो. .. मग तो कोणत्याही रूपात असो , पित्याच्या , पुत्राच्या भावाच्या किंवा पतीच्या रूपात …… तो आपल्या पाठीशी उभ राहण्याची गरज आहे … फक्त मी आहे असं जरी त्यांनी सांगितल , तरी आपल्याला लढण्याची हिंमत येते . तलवार असते हातात, पण पाठी आधार नसल्याने आम्ही लढूच शकत नाही . कारण आमच्यावर वारं चोहोबाजूने होत असतात , निदान एक बाजू तरी कृष्णाची हवी होती पण हा कृष्ण भेटणार कुठे ?
मी पोटात असतानाच शब्दांच महाभारत चाललेलं होतं , मी लढायला तयार असते पण मला जन्म घेण्याचा अधिकार नकारला जातो , तेव्हा ही कृष्ण येत नाही …मग मुद्दा शिकण्याचा येतो , बस मध्ये , बस स्टॉपवर कॉलेजमध्ये , कुठेही कृष्ण भेटत नाही , ऑफिसातल्या दुर्योधन , दुशासनासणाच्या हाताखालून जाताना सुद्धा कृष्ण भेटत नाही… नंतर सासू-सासर्यांच्या संग्रामात लढताना सुद्धा कृष्ण भेटत नाही … शेवटी अनाथ आश्रमच्या पायऱ्या चढताना सुद्धा कृष्ण भेटत नाही …
आपल्याला माहिती आहे ,महाभारताच्या युद्धात बाणांच्या वेदनेने असाहाय झालेल्या भीष्माला कृष्णाने वेदनामुक्त केलं होतं , द्रौपदीला वस्त्रहरणातून वाचवलं होतं , कुंतीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधलं होतं , देवकी आणि यशोदा या दोघींनाही सांभाळलं होतं , मग आता तो कुठे राहतो ? तो पाठीशी उभा असता तर मी जग जिंकून दाखवलं असतं , वार तलवारीचा असता तर अभिमानाने सोसले असते , पण इथे घाव शब्दानेच होत असतो , भळभळणार रक्त इथे दिसत नाही , पण धगधगणाऱ्या आत्म्याने मी पेटून जाते , आणि स्वतःचं अस्तित्वच नष्ट करू पाहते , एकदाच मिळालेल्या या जन्माला सुद्धा ती कंटाळून जाते ….
कारण आज शब्दांच महाभारत सोसायला तिला कृष्ण हवा आहे … तिला कृष्ण हवा आहे … पण तू अजूनही भेटत नाही ……
शब्द संख्या ३००
रूपाली मठपती
