गोष्ट दुसऱ्या लग्नाची

# माझ्यातली मी
# विकेंडटास्क
# लघुकथालेखन
दि. 26 जानेवारी 26

दारावरची घंटी वाजताच सरोजनी दरवाजा उघडला दारात आपली मैत्रीण शुभांगी ला पाहताच तिला रडू कोसळले .
अग काय दशा करुन घेतलीस ग सरु..अगदी सारे संपल्यागत.
मग काय करु ग मी..बापाविना वाढवल ग मी मोठया हिमतीने माझ्या साक्षीला दुखा:ची झळ पण लागू दिली नाही पण आज नियतीने बेईमानी केली एका वर्षात पोरीच सौभाग्य हिरावून घेतल. माझ्या नतंर कसा काढेल ग उभा जन्म अनुभव आहे म्हणून बोलते ग.
किती बोलशील…थांब थोड आज मी याच विषयावर बोलायला आले तुला आठवते आपली मैत्रीण सावली देशमुख सध्या ती अमरावतीला असते पहिल्या पासून च तिला सोशल गोष्टीत रस होता. आता जरा रोजच्या व्यापातून मोकळी झाली तिने एक छान उपक्रम हाती घेतला तिच्या उपक्रमाचे नाव आहे…. गोष्ट दुसऱ्या लग्नाची.
काय सांगतेस ग …दुसर लग्न अग शक्य आहे का?अन लोक काय म्हणतील.
कोणत्या युगात जगते आहेस ग…आज काय एकत्र कुटुंब राहील काय सर्वांना सामावून घ्यायला.. तुझा त्रास आठवत नाही काय.
हो ग खरच आहे पण दुसर लग्न म्हणजे….
अग याच विचारांमधून तर सावलीने हा उपक्रम हाती घेतला..अकाली ज्यांचे साथीदार सोडून गेले , परित्यक्ता, घटस्फोटीत अशा सर्वांना आपले आयुष्य पुन्हा उत्तम प्रकारे जगता यावे मागे एकट राहिलो म्हणजे आयुष्य सपंल अस नव्हे तर एकदाच मिळालेल जीवन जगण्याचा अधिकार सर्वांना आहे.
हा विचार करुनच सावलीने आज सुरु केले
देशमुख सेकंड मॅरेज ब्युरो
गेल्या एका वर्षात अशा सात लोकांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणलेत.शिवाय ज्यांचे विवाह काही कारणांनी झाले नाहीत अशासाठी सुद्धा येथे मदत मिळते
सावलीच्या ब्युरो चा नाराआहे

” गोष्ट करु दुसऱ्या लग्नाची
संधी जीवनाला पुन्हा सावरायची ”
विनया देशमुख

error: Content is protected !!