#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#विकेंडटास्क
#जाहिरातलेखन
@everyone
#टॅगलाइन … कपडे विकतो
विश्वास कमावतो
भाग्यश्री तिच्या शेजारच्या मैत्रिणींशी सुमतीशी छान गप्पा मारत असते. तेवढ्यात भाग्यश्री च्या मोबाईल वरती तिच्या मुलीचा फोन येतो. मुलीचं नुकतंच लग्न झालेल आणि तिचा आता फोन आला त्याच्यामुळे भाग्यश्रीने एकदम आनंदाने फोन घेतला तर तिची मुलगी रेवती तिला म्हणाली की आई अगं तुला एक आनंदाची बातमी सांगते आम्ही फक्त दहा मिनिटांसाठी घरी तुला भेटायला येतो आहे .आम्ही पोहोचूच घरी अर्ध्या तासात .लग्नानंतर रेवती पहिल्यांदाच तिच्या घरी येणार त्यामुळे भाग्यश्रीला खूप आनंद झाला. पण भाग्यश्री तिला फोनवर म्हणाली की अगं तू आधी का नाही कळवलं तू पहिल्यांदा येणार मग तुझं नीट स्वागत नको का करायला मला? आणि तुझ्याबरोबर कोण कोण येतय? तेव्हा रेवती म्हणते,” अगं आई ,मी एकटी नाही आहे माझ्याबरोबर माझे सासू-सासरे,माझे जेट, माझ्या जाऊ बाई , त्यांच्या दोन मुली नंतर तुझे जावई . आम्ही एवढे सगळेजण येत आहोत .” भाग्यश्री म्हणते अगं तू मला आधी का नाही कळवलं ? भाग्यश्रीला कुठेतरी टेन्शन येतं की मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी पहिल्यांदा सासरच्या मंडळींबरोबर घरी येत आहे तर त्यांचा पाहुणचार, स्वागत ,कपडेलत्ते नीट व्हायला पाहिजे आणि भाग्यश्री एकटीच घरात असते ,तिच्या मदतीला कोणी नसत .
मग तेव्हा रेवतीच्या सासूबाई भाग्यश्रीला म्हणतात ,”अहो मुद्दामूनच आधी कळवलं नाही कारण मग तुम्ही उगाच सागर संगीत सगळं करत बसाल. आणि ते आम्हाला नको होतं. आमचं एके ठिकाणी इकडे नाशिकला वास्तुशांतीला यायचं ठरलं होतं. पण आम्ही रेवतीला सांगितलेलं होतं की आपल्याला नाशिकला तर जायचं आहे पण तुझ्या माहेरी नाही जाता येणार कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघायच आहे . त्यामुळे रेवतीने ही नाही सांगितलं तुम्हाला ..पण रेवतीच्या आनंदासाठी आम्ही दहा मिनिटांसाठी आमची गाडी तुमच्या घराकडे वळवतो . आम्हाला तुमच्याकडून काही नको. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हवं तर फक्त तुम्ही सगळ्यांसाठी एक कप चहा ठेवा .जेवण आमचं वास्तुशांती ठिकाणी होणार आहे ..”अस म्हणून त्यांनी फोन ठेवला .
मुलगी आणि मुलीच्या सासरकडचे पहिल्यांदा घरी येत आहेत तर आता मी काय करू ? असा प्रश्न भाग्यश्रीला पडला .
तिने सुमतीला सर्व सांगितल्यावर सुमती म्हणाली की तू काही काळजी करू नको माझ्या पण मुलीच्या बाबतीत असंच झालेल . अचानक नऊ महिन्याच्या आधीच तिला त्रास व्हायला लागला . मी आणि ती आम्ही दोघीच घरी ,हॉस्पिटल मधे नेल, त्याच दिवशी डिलिव्हरी झाली .मग नंतर तिच्यासाठी फीडिंग गाऊन, बाळाचे झबले, टोपले इतर कपडे हे सगळं मी आदित्य शॉप च्या स्वातीताई त्यांना मी फोन केला आणि त्यांना मी सांगितलं की अहो असं असं झालेल आहे आणि मी एकटीच आहे त्यामुळे माझी खूप पंचायत झालेली आहे तर तुम्ही मी सांगितलेले कपडे एका शेजारच्या मुलाला पाठवते त्याच्याबरोबर पाठवून द्या .. पैसे मी दोन तीन दिवसात आणून देईन ..
स्वाती ताईंनी सांगितलं की तुम्ही बाळ बाळंतीण ची काळजी घ्या ,हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला की या निवांत पैसे घेऊन ..
सुमतीने आदित्य शॉप च्या स्वाती ताईंना व्हिडिओ कॉल लावला , आणि भाग्यश्री ने रेवतीच्या सासरच्या सगळ्या मंडळींसाठी सांगितलेल्या बजेट प्रमाणे कपडे पाठवून दिले ..
भाग्यश्रीच्या मुलीच्या सासर कडचे लोक अगदी आश्चर्य चकित झाले की इतक्या कमी वेळात भाग्यश्रीने कसे सगळ्यांसाठी छान कपडे आणले.. आनंदाने सगळ्यांना छान छान कपडे देऊन भाग्यश्रीने त्यांना रवाना केलं.
दुसऱ्या दिवशी भाग्यश्री आदित्य शॉप मध्ये पैसे द्यायला गेली आणि तिने स्वातीताईंना सांगितलं ,” तुम्ही वेळेवरती मला मदत केली आणि सगळे कपडे पाठवून दिलेत मी एकटीच घरात होती त्यामुळे मला पैसे काढून लगेच पाठवण ही शक्य नव्हतं पण तरी तुम्ही एका विश्वासाने सगळे कपडे एका फोन कॉल वरती पाठवलेत. सगळे माझ्या मुलीच्या सासर कडचे लोक छान छान कपडे पाहून खूप खुश झाले आणि एवढ्या लवकर मी सगळी व्यवस्था केली म्हणून त्यांना माझं कौतुक ही वाटलं आणि त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे ..”
तेव्हा स्वातीताई मला एकच म्हणाल्या की आम्ही कपडे विकतो आणि विश्वास कमवतो.. हीच तर आमची टॅगलाईन आहे कपडे विकतो आणि विश्वास कमवतो.. आदित्य शॉप मध्ये कपडे मिळतात मस्त मस्त आणि ग्राहकाची पसंती आम्हाला मिळते जास्तीत जास्त..
#ब्रँडनेम – आदित्य शॉप
#टॅगलाइन –
आदित्य शॉप मध्ये कपडे मिळतात मस्त मस्त
ग्राहकाची पसंती मिळते जास्तीत जास्त.
कपडे विकतो
विश्वास कमावतो
©® सौ स्वाती येवले
