परिक्षेची भिती कि यशाची खात्री?

#माझ्यातलीमी

#विकेंडटास्क

#जाहिरातलेखन

परीक्षेची भीती की यशाची खात्री?

रात्रीचे १२ वाजले होते. १० वीत असलेल्या ‘आर्यन’च्या खोलीतला दिवा अजूनही चालू होता. गणिताची पुस्तकं समोर उघडी होती, पण त्याच्या डोळ्यात फक्त पाणी होतं. “आई, मला हे प्रमेय (Theorem) काही केल्या समजत नाहीये, मी नापास होणार का गं?” आर्यनने रडत रडत विचारले.

त्याची आई, सुजाता, काळजीने त्याच्याजवळ बसली. तिने पाहिले की आर्यन कष्ट तर करतोय, पण त्याला योग्य दिशा मिळत नाहीये. दुसऱ्याच दिवशी तिने आपल्या मैत्रिणीचा सल्ला घेतला आणि आर्यनचा प्रवेश ‘नि. म. ॲकेडेमिक क्लासेस’ मध्ये केला.

तिथे गेल्यावर आर्यनला जाणवलं की, शिक्षण म्हणजे फक्त पाठंतर नाही. तिथल्या शिक्षकांनी त्याला खेळत-हसत कठीण संकल्पना समजावून सांगितल्या. वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे आर्यनचा आत्मविश्वास वाढला. अवघड वाटणारी गणितं आता त्याला सोपी वाटू लागली होती.

काही महिन्यांनी निकाल लागला. आर्यनने गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवले होते! निकालाची प्रत हातात धरून तो धावतच आपल्या शिक्षकांकडे आला आणि म्हणाला, “सर, तुम्ही फक्त शिकवलं नाही, तर माझा स्वतःवरचा विश्वास परत मिळवून दिला.”

आज सुजाता निश्चिंत आहे, कारण तिला माहिती आहे की तिच्या मुलाचे भविष्य सुरक्षित हातात आहे.

खरंच

“इथेच होते स्वप्नांची प्रगती, यशाची खात्री आणि उत्तम जडणघडण!”

ब्रँडचे नाव: नि. म. ॲकेडेमिक क्लासेस (N. M. Academic Classes)

टॅगलाईन: “जिथे होते स्वप्नांची प्रगती, यशाची खात्री आणि उत्तम जडणघडण!”

✍️र सि का

©️®️रसिका चवरे

error: Content is protected !!