# माझ्यातली मी
# लघुकथालेखन टास्क
दि.20 जानेवारी 26
विषय…
खुप गरज असल्यावर घावून येणारी व्यक्ती करोडो रुपयापेक्षाही महाग असते
ईश्वररुप
हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या बार्डर वरची हाड गोठवणारी थंडी ..मेजर अखिलेशकुमारच्या नेतृत्वाखाली पधंरा जवान सिमारक्षण करत होते. जवान कमी असल्याने सर्वच जण डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. नागरी वस्ती थोड्या दूरवर अंतरावर होती.
रात्री चे साधारण तिन वाजले होते. अन अचानक बार्डर च्या दुसऱ्या भागातून बंदुकीचे आवाज सुरु झाले. समोरुन हमला झाला होता.अखिलेश सावध झाला व फायर ,अटॅक ची आर्डर दिली व स्वतः ला पुर्णपणे झोकुन देत पुढे सरसावला .समोरच्या शत्रु पुढे आपल्या मुठभर जवानांचा टिकाव लागणार नाही माहीत होते तरी पण आज भारत मातेला प्राण अर्पण करण्याची वेळ आली आहे असा निर्धार करुन तो पुढे गेला.एक तासाच्या चकमकीनतंर शातंता झाली अवघ्या मुठभर लोकात कोण शहीद झाले व कोण वाचले पत्ताही नाही लागला.
अखिलेश नी डोळे उघडले डोके भारी होते ,कुठे आहोत हे पण कळत नव्हते. तोच समोरुन एक मध्यमवयीन जोडप समोर आल त्यातील पुरुषानी त्याला आधार देऊन बसवले व स्त्री ने त्याला गरम सुप पाजले .पोटात अन्न गेल्यावर तो थोडा सावरला तेव्हा त्याला सागंण्यात आले की तो गेले दहा दिवस बेशुद्ध होता. हे भारतातलेच पण बार्डर जवळचे गाव आहे. चकमकीनतंर सकाळी आम्ही जेव्हा बाहेर आलो कुणीही जिवंत दिसले नाही .दूरवरून कुणीच दिसत नाही हेपाहून आम्ही थोडे वर आलो तर बर्फाखालून एक मिलिटरी शुज दिसायला लागला तो शुज असावा असा विचार करत आम्ही परत फिरलो तर पायाला गन लागली ती ओढताच हात बाहेर आला .वेळ न गमावता भराभर बर्फ बाजूला केला तर एक जवान दिसला बर्फात सुद्धा छाती गरम होती दोघांनी ओढत घरी आणले गरम शेक दिला.शरीर थोडे गरम झाले. नतंर रोज तेल मसाज व गरम शेक चालू ठेवला
आज दहा दिवसानी तुम्ही शुद्धीवर आलात.आम्ही पहाडी लोक माहीत असलेल्या जडीबुटी चे उपचार केले एक जीव वाचला हिच खुशी आहे.
अखिलेश भारावून गेला तो बोलला आज माझ्या जीवनात तुमची किमंत करोडो रुपयापेक्षाही खुप जास्त आहे. ती किमंत मी कधीच चुकवू शकणार नाही .पण कधीही आवाज दिला तर हजर असेन हे माझे वचन आहे आज माझ्या साठी तुम्ही ईश्वररुप आहात.
विनया देशमुख
.
