योग्य सल्ला…

# लघुकथा लेखन टास्क (१९/१/२०२६)

खुप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती
करोडो रुपयांपेक्षाही महान असते. या वाक्यावरून लघुकथा.

. …… योग्य सल्ला ……

स्वरा कॅब मध्ये बसली होती. रडत होती. थोड्यावेळाने स्वरा म्हणाली एखाद्या चहाच्या टपरीवर गाडी थांबवा. माझे डोके खुप दुखतंय, आल्याचा कडक चहा प्यायल्यावर स्वराला खूप बरे वाटले.

ती म्हणाली, मी पुढे तुमच्या शेजारी बसले तर चालेल का? बसाना मॅडम…. स्वरा पुढे येऊन बसली. ती जरा सावरली होती. तुमचे नाव काय? मी सुशांत. तुम्हाला माझ्याशी काही शेअर करायचे असेल तर करू शकता. स्वरा म्हणाली, मी व योगेश एकाच ठिकाणी कामाला होतो. त्याने लग्नाचे वचन दिले होते. मी त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला व नको ती चूक केली. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे हे कळल्यावर त्याने घरातून पैसे व सोन्याचे दागिने घेऊन ये, आपण देवळात लग्न करू म्हणाला, म्हणून मी आले पण पैसे व दागिने आणले नाहीत म्हणून त्याने लग्नाला नकार देऊन निघून गेला. आईबाबा गावी कोकणात असतात. मला मुंबईत नोकरी मिळाली म्हणून मी मामाकडे राहते. आता घरच्यांना काय सांगू कळत नाही.

मॅडम, वाईट वाटून घेऊ नका. जे होते ते चांगल्यासाठीच होते. त्याने आता लग्न केले असते व नंतर पैशासाठी तुम्हाला त्रास दिला असता तर…..मग पश्चात्ताप झाला असता. आता रात्र बरीच झाली आहे. तुमची हरकत नसेल तर जवळच माझे घर आहे. घरात आई आहे . सकाळी मी तुम्हांला घरी सोडतो. घरी एक फोन करून सांगा की, मी मैत्रीणीकडे आहे. तिने घरी त्याप्रमाणे फोन केला. सुशांतने आईला सर्व सांगितले. त्या म्हणाल्या, पोरी जे झाले ते वाईट झाले. या बाळाला जन्म तू देऊ नये असे मला वाटते. तुझी व तुझ्या बरोबर तुझ्या नातेवाईकांची बदनामी होणार. बघ तुला पटत असेल तर … मी येईन तुझ्या बरोबर, आपण उद्या दवाखान्यात जाऊन…..
तिलाही पटले. घरातल्यांना कसे सांगू हे मनावरचे मोठे दडपण दूर झाले. बदनामी पण टळली.

तिच्या गरजेच्या वेळी, सुशांतची आई निस्वार्थ मनाने धाऊन आली व तिला मायेने समजावून योग्य सल्ला दिला. याचे मोल पैशात कधीही करता येणार नाही.

शब्द संख्या : ३०२

error: Content is protected !!