# माझ्यातली मी
# विकेंड टास्क १७-१-२५
#कथा लेखन
“**पाहिले तुला न मी ,तू मला न पाहिले “*
ना कळे तरी कसे मन वेडे गुंतले ॥
खरंच मन वेडं असतं . ते कधी ,कुठे ,कसे , कोणात गुंतेल
सांगता येत नाही . एवढंच नाही तर
ज्याच्यामध्ये मन गुंतले असेल त्या
व्यक्तीचा रंग , रूप , जात , धर्म
यांचाही विचार न करता ते त्याच्यात
गुंतत जाते .
इतकी प्रस्तावना लिहायचे कारण म्हणजे आमच्या अगदी शेजारीच एका कुटुंबात घडलेली ही
गोष्ट अगदी डोळ्यांसमोर येते,
गोखले कुटुंब आमचे शेजारी.
चौकोनी सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंब.त्यांना एक मुलगा व एक
मुलगी होती. मुलाचे नाव रोहन व मुलीचं नाव नेहा . तर आई शाळेत
शिक्षिका व वडील होते बॅंकेत .
नेहा M.A झाली व ती नोकरीच्या शोधात होती . तिला साहित्यात रस होता तरी गाण्यात ती खूप रमायची . असेच एकदा तिने
रेडिओवर एक गाणे ऐकले. व ती त्या आवाजाच्या प्रेमात पडली . तो आवाज होता धनंजय भावे यांचा .
ती त्या आवाजाने इतकी
मंत्रमुग्ध झाली की तो आवाज तिच्या कानात घुमत राहिला. तिला बाकी काही सुचत नव्हते. व ती त्या आवाजाच्या शोधात होती . धनंजयच्या गाण्याच्या मैफिली होत होत्या पण त्या दूरच्या शहरात .
त्याला प्रत्यक्ष पहायचा योग येत
नव्हता .
त्यांच्या गाण्यातला फिरता गळा ,
ताना घेण्याची पध्दत ,गोडवा व भारदस्स्तपणा. याने ती
भारावून गेली होती. तिच्या मनात विचार आला की ज्याचा आवाज एवढा मोहक तो प्रत्यक्षात कसा दिसत असेल ? गुणी कलावंत असणार ! असा विचार करून तिने त्याचा फोन नंबर मिळवला . त्याला पाहण्याची उत्सुकता वाढली होती म्हणून तिने मनात धीर करून फोन लावला. व गोड आवाजात धनंजयने प्रतिसाद दिला ,”हॅलो , कोण बोलताय ?”हे ऐकून नेहा इतकी भारावून गेली की तिला काय बोलावे हेच सुचेना !
मग त्यानेच पुन्हा विचारले “अहो तुम्ही मला का फोन केलात?
तेव्हा नेहा भानावर आली व म्हणाली ,” मी नेहा बोलतेय . मी तुमच्या आवाजाची व गाण्याची
खूप फॅन आहे.जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुमचे गाणं ऐकते व कानात तुमचा आवाज साठवून तृप्त होते.
तुम्हाला भेटण्याची ओढ लागली आहे,तेव्हा धनंजय म्हणाला ,”अहो,मला तर तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण तुमच्या बोलण्यात
गोडवा आहे व बोलण्याच्च्या पध्दती वरून वाटते , तुम्ही चांगल्या घरातील
सुजाण स्त्री आहात!”
तेव्हा नेहा म्हणाली, मी संस्कृत मध्ये MA केले आहे तरीपण ं गायनाची आवड होतीच ,
म्हणूनच तुमच्या आवाजातील गाण्यातील गोडव्याने आकृष्ट झाले.”
धनंजय म्हणाला , “ माझी व तुमची आवड एकच आहे ,म्हणून आपण मला व माझ्या आई -वडिलांना भेटायला अवश्य या .
त्याला थोडा विनोद करायची इच्छा
झाली म्हणून तो म्हणाला ,” ज्यांचा संस्कृत विषय असतो ते सुसंस्कृत
असतात असे म्हणतात “
माझा पत्ता पाठवीत आहे. पण एक विचार मनात येत आहे ,
“**पाहिले तुला न मी , तू मला न पाहिले ,
ना कळे तरी कसे ,मन वेडे गुंतले ?”
तुला पण असेच. वाटतेय ना ?
यालाच Wave lines जुळणे म्हणत असावेत,हो ना !
त्यानंतर काय होईल माहित नाही पण “
Lets hope for the best “
अनुराधा श्यामसुंदर भोगले
बोरिवली ,पश्चिम
मुंबई ४०००९१
मोबा – ९८३३३४१३६२
