मन वेडे गुंतले

IMG_20260118_235532.jpg

#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(१७/१/२६)
#वाक्यावरूनकथा
@everyone

#पाहिलेनामीतुलातूमलानाहीपाहिले

**मन वेडे गुंतले**

डॉक्टर मंगेशच्या मनात विचारांचा काहूर माजलं होतं कारण आईने ऑर्डरच सोडली होती की काही झालं तरी दसऱ्याच्या दिवशी तू घरी यायचं म्हणजे यायचं. मंगेशला माहिती होतं की आई का बोलवते .मंगेशच्या आईला मंगेश च लग्न करण्याची घाई झाली होती आणि नक्की मुली बघण्याचा प्रोग्राम तिला करायचा असेल आणि जे मंगेशला नको होतं.. त्याला अजून दोन वर्षे तरी लग्न करायची इच्छा नव्हती. त्याला लग्नासाठी काही अवधी हवा होता .पण मंगेशच्या आईला वाटत होतं की मंगेश डॉक्टर झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्ष झालं चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे, आता सेटल झालेला आहे तर त्याच आता लग्न करावं .. मंगेश घरी पोचल्यानंतर आईने थोड्या वेळाने विषय काढलाच हे बघ बारा मुलींचे फोटो आणि बायोडेटा आलेले आहेत ते बघून घे तू सांगशील त्या मुलींच्या घरी संपर्क करून बघायचा प्रोग्राम करून टाकू मग त्यातली एखादी पसंद करू ..मंगेशला इच्छा नसतानाही ते मुलींचे फोटो आणि बायोडेटा बघायला त्याने सुरुवात केली ,पहिले चार फोटो,बायोडेटा त्याने बघितले आणि काहीतरी कारण सांगून त्याने रिजेक्ट केले.

पण पाचवा फोटो बघितल्यावर मंगेश चमकला आणि मग लगेच आईला म्हणाला की आई ह्या मुलीच्या घरी फोन कर ह्यांना बोलवून घे .. मुलीच्या बायोडेटा वरून त्याला कळलं की ही मुलगी पण डॉक्टरच आहे डॉक्टर मिताली ..मंगेश खूप खुश झाला. मंगेशच्या आईला एकदम आश्चर्य वाटल की आतापर्यंत जो मुलगा नाही म्हणत होता की मला एवढ्यात लग्न करायचं नाही तो मुलगा कसा पटकन तयार झाला..

कारण असं होतं की मंगेशने चार वर्षांपूर्वी मितालीला त्याच्या चुलत भावाच्या लग्नात बघितलेल.. मंगेशला बघताक्षणी ती खूप आवडली ..तीच सौंदर्य ,तिचा निरागसपणा त्याने डोळ्यात साठवून ठेवला होता ..लग्नात तिने लाल रंगाचा घागरा घातला होता त्यात तिचा गोरेपणा अजून खुलून दिसत होता .. मंगेशला वाटलं होतं की किती सुंदर आहे मुलगी ज्याची कोणाची बायको होईल तो खरच नशीबवान असेल पण मंगेशच तेव्हा ध्येय वेगळं होतं त्याला त्याचं मेडिकल शिक्षण पूर्ण करून चांगल्या हॉस्पिटल मधे नोकरी करायची होती.. मग काही अनुभवानंतर स्वतःच क्लिनिक काढायचं होत ..त्याच्यामुळे त्याने तिची चौकशी केली नाही की कोण मुलगी आहे ,तिचं नाव काय आणि तो तिथून निघून गेला ..

पण तरीसुद्धा मंगेशच्या मनात मध्ये मध्ये त्या मुलीचा विचार यायचा आणि पुन्हा एक वर्षांपूर्वी एका मेडिकल कॉन्फरन्स मध्ये अचानक मंगेश ला ती मुलगी पुन्हा दिसली होती पण तेव्हा मेडिकल कॉन्फरन्सला खूप गर्दी होती त्याच्यामुळे त्या गर्दी मधे फक्त एक झलक त्याने तिला बघितलं नंतर ती पुन्हा कुठे गेली हे त्याला कळलच नाही.. नाहीतर त्याने ठरवलेलं होतं की पुन्हा जर ती कॉन्फरन्स मध्ये दिसली तर जवळ जाऊन तिच्याशी बोलायचं कारण तोपर्यंत तो सेटल झाला होता.. पण नंतर ती पुन्हा कॉन्फरन्स मध्ये दिसलीच नाही .

मिताली त्याच्या त्या चुलत भावाच्या बायकोची मावस बहीण होती आणि त्यांनीच मिताली चा फोटो , डिटेल्स मंगेश च्या आईला पाठवले होते ..

मिताली आणि तिच्या घरचे येईपर्यंत मंगेश त्या मुलीवर म्हणजे मिताली वर त्याने जुळवलेलं एक गाण नकळतपणे गुणगुणत होता ..

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

लग्नसमारंभात कांती तव पाहूनी
प्रेमभावना आल्या माझ्या मनातूनी
घोळले तुझे विचार न कधी थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

मिताली आणि तिच्या घरचे आल्यावर काही जुजबी प्रश्न एकमेकांना विचारल्यावर , मिताली चे वडील म्हणाले , तुम्ही तुमचा निर्णय कळवा, आम्ही आमचा कळवतो .त्यावर मंगेश पटकन म्हणाला की मला मुलगी पसंद आहे , माझ्या आईवडिलांची , मुलीची आणि तिच्या आईवडिलांची तयारी असेल तर मी डॉक्टर मिताली बरोबर लग्न करायला तयार आहे..

मंगेश च्या आई वडीलांना सुखद आश्चर्य वाटलं कारण जो लग्नासाठी नाही म्हणत होता तो एका मुलीच्या स्थळात च स्वतःहून हो म्हणाला ..

पण सगळ्यांसाठी पुढचा धक्का जास्त मोठा होता कारण मिताली ही म्हणाली की मी ही तयार आहे डॉक्टर मंगेशशी लग्न करायला ..

घरच्यांनी पुढची लग्नाची बोलणी सुरू केली तेव्हा मंगेश ,मिताली ला घेऊन पेढे आणण्याच्या निमित्ताने बाहेर गेला .. मंगेश ने मिताली ला तो लगेच का हो म्हणाला हे सांगितलं अगदी त्याच आवडत ते जुळवलेलं गाण म्हणून

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

लग्नसमारंभात कांती तव पाहूनी
प्रेमभावना आल्या माझ्या मनातूनी
घोळले तुझे विचार न कधी थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

मग त्याने मितालीला विचारलं पण तू लगेच कशी हो म्हणालीस ?..

तेव्हा मिताली म्हणाली , “माझ्या स्वप्नाच्या राजकुमाराला मी आधी कधी बघितले नव्हते पण तुला बघितलं आणि मला ही वाटलं ,

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले”

सौ स्वाती येवले

error: Content is protected !!