#माझ्यातली मी
#लघुकथा
रोजच्या प्रमाणे विनयला त्याच्या मित्रांनी आजही थांबवून घेतलं …. मित्र म्हणाले की ,” रोज एक नवीन कारण सांगून तू घरी निघून जातोस , कधीतरी चुकून आमच्या सोबत वेळ घालवतोस , पण आज आम्ही तुला सोडणार नाही , निदान आजचा दिवस तरी आमच्या सोबत एन्जॉय कर , ..अरे घरी काहीतरी कारण सांग , मी उशिरा येणार आहे म्हणून , आता आम्ही रोजच नाही का , काहीतरी कारणे सांगत .”
त्यावर विनय अतिशय नम्रतेने आपल्या मित्रांना म्हणाला की , “हक्काच्या माणसांना कारणं सांगायची नसतात , तर त्यांना वेळ द्यायचं असतं , कारण आज मी माझ्या मुलांना त्यांच्यासोबत चित्रे काढण्यासाठी मदत करेन असं सांगितलं आहे , त्यामुळे मला घरी लवकर जावे लागेल .”… असे म्हणून तो घरी निघाला …
.. जाता जाता मित्रांना म्हणाला ..
” आज मी माझ्या हक्काच्या माणसांना म्हणजेच माझ्या बायको मुलांना वेळ दिला तर कदाचित त्याची त्यांना जाणीव असेल , आणि पुढे भविष्यात तेवढ्याच हक्काने आपली मुलं आपल्याला वेळ देतील , आणि आपाल्याला सांभाळतील सुद्धा ” …
रूपाली मठपती…
शब्द संख्या. 150
