# माझ्यातली मी #
*** लघुकथालेखनटास्क***(१२/१/२६)
….. हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात….संगीता मॅडमच्या या ओळीवरून लघुकथा
…………. वैचारिक एकात्मता…………..
शिल्पा मुंबईत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होती. कंपनीत ती चांगल्या प्रकारे रुळली. ती आई-बाबांसोबतच राहत होती. एकटीच असल्याने तशी ती लाडात वाढलेली पण शिक्षणाच्या बाबतीत ती फार ध्येयवेडी होती. तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तिला या कंपनीत फारसे कष्ट न घेता चांगली नोकरी मिळाली.. नोकरीत पार बुडून गेलेली. तिला मोठे व्हायचे होते. लग्न संदर्भात आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती.
असे चार दोन वर्ष निघून गेलेत. आई-वडिलांनी तिच्या लग्नासाठी तगादा लावला. तीशीत आली होती ती. त्यामुळे ते तणावात होते. त्यांचा धीर सुटत चालला. तिला आपल्या स्टेटस मध्ये बसणारा मुलगा नवरा म्हणून हवा होता. कमी पगार असलेल्या स्थळांकडे ती ढुंकूनही पाहत नव्हती. म्हणून ते अजून तणावात वावरायला लागले.
एक दिवस एक चांगलं स्थळ सांगून आलं. नोकरी चांगली व मुलगा ही चांगला. पगारात फक्त उन्नीस-बीस चा फरक. त्याचा पगार तिच्या तुलनेत थोडासा कमीच. त्यामुळे तिने ते स्थळ नाकारले. आता आम्ही तुझे ऐकणार नाही असा वडिलांनी दम भरला. या त्यांच्या आग्रही, जबरदस्ती स्वभावाला कंटाळून तिने दोन दिवस शांततेत घालवावे म्हणून एखाद्या तीर्थस्थळी जाण्याचे ठरविले.
एक दिवस सकाळी लवकर उठून आई-बाबांना मी मैत्रिणी सोबत फिरायला चालले म्हणून सांगितले. ओंकारेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन नर्मदा तीरी एका शांत ठिकाणी ध्यानस्थ बसावे अशी इच्छा तिला झाली व ती शांत ठिकाणी एका झाडाखाली बसताच तिची नजर समोर एका तरुण योगी पुरुषाकडे गेली. त्याचीही नजर तिच्याकडे गेली व तो ध्यानाला बसायच्या आधी तिला भेटायला आला.
तो म्हणाला,
आपली ओळख तिला दाखवायच्या आधी
कोण तुम्ही? या अशा शांत ठिकाणी ध्यानस्थ होण्याची का इच्छा झाली?
मग तिने घरचा वृत्तांत सांगितला.
तो म्हणाला,
माझीही तीच अवस्था आहे. तुम्ही मला ओळखलं नाहीत. ज्याला तुम्ही नाकारले होते तोच मी. मला तुम्ही खूप आवडल्या होत्या. तुम्ही नकार दिल्यामुळे लग्नच करायचे नाही म्हणून मी संन्यास घेण्याचा विचार करीत आहे. आता आपण दोघांनीही संन्यास घेऊन महादेवाच्या चरणाशी व नर्मदेच्या पायथ्याशी स्वतःला वाहून देऊया.
त्याचा विचार ऐकून ती अवाक झाली व लगेच तिने स्वतःचा निर्णय बदलला व त्यास म्हणाली की, तू संन्यास घेणार नसशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.
तोही म्हणतो,
माझाही विचार पक्का होत नव्हता पण आता तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण पुढील वाटचाल करूया व हक्काची माणसं होऊयात.
…… शब्द संख्या….. ३२१
……….. अंजली आमलेकर………
