# माझ्यातली मी
# लघुकथा लेखन टास्क
दि. 13 जानेवारी 26
विषय…. हक्काची माणसं कारण नाही वेळ
देतात.
प्रसाद दिक्षीत एका मल्टि नॅशनल कंपनीत नौकरी करणारा पण वृत्तीने काहीसा गुलहौशी .त्याच्या आईबाबांना हे चांगले माहित तरी सुद्धा लग्न झाल्यावर येईल जागेवर म्हणून एक दूरच्या गावातली गरीब घरातली मुलगी मंजिरी हिच्या सोबत लग्नगाठ बाधंली.
मंजिरी सुंदर, सालस ,मेहनती मुलगी वडिलांची छाया नाही. आईचे कष्ट पाहून गाण शिकायची आवड मनात ठेवून नौकरी भेटेल अस व्यवसायिक शिक्षण घेते याचवेळी आईचाच विचार करुन लग्नाला तयार होते.
नवीन नवीन काही दिवस प्रसाद ठिक वागतो पण नतंर लवकरच त्याची बाहेरची प्रकरणे मंजिरी ला समजतात.आपल्या गरिबीचा फायदा घेवून आपली व आईची फसवणूक झाली हे लक्षात येते. यात कळस म्हणजे प्रसाद एका मैत्रीणीला घरीच आणून ठेवतो. तो आता आईबाबांना पण जुमानत नाही आपल्या मुलाचे वागणे पाहून ते दु:खी होतातच पण त्यांना आपल्या कडून एका सालस मुलीची फसवणूक झाली याचा जास्त पश्चाताप होतो .
स्वतः पुढाकार घेवून ते मंजिरी ला प्रसाद पासून डिवोर्स मिळवून देतात.या दरम्यान मंजिरी च्या आईचे निधन होते.अशा वेळी तिला एकट न पडू देता तिचे स्वखुशीने पालकत्व स्विकारतात. भुतकाळाची कोणतीच छाया मंजिरी वर नको असा विचार करुन मंजिरी च्याच गावाला स्थायिक होतात. प्रसाद ला तर आता बधंन च उरत नाही त्यामुळे तो खुश होतो.
रिटायर्ड झाल्यावर मिळालेल्या पैशाच्या आधाराने ते मंजिरी ची गाण शिकायची ईच्छा पुर्ण करतात . तिची आवड व योग्य गुरु मिळतात ति अल्पावधीत एक उत्तम गायीका होते. शास्त्रीय संगीतात तिला विशेष आवड असते . हळूहळू तिची गायकी भारतातच नव्हे तर परदेशात पण पोहचते सतत कार्यक्रम सुरुच राहतात. काहीशी अध्यात्मिक अशी तिची गायकी लोकांना आनंदा सोबत एक मानसिक समाधान पण देते.
आजचा दिवस मंजिरी साठी मोठा अभिमानाचा असतो. तिला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर होतो. तो स्विकारतानां ती आपल्या आईबाबांना सर्व श्रेय देते . मनोगत व्यक्त करतांना ती बोलते या माझ्या माणसांनी मला वेळ न देता काही कारण दाखवून दूर लोटले असते तर मंजिरी केव्हाच संपली असती. आजचा सर्व सन्मान मी या माझ्या आईबाबांना अर्पण करते.
विनया देशमुख
शब्द संख्या… 290
