# माझ्यातली मी
# विकेंड टास्क
#कथा लेखन ९-१-२०२५
**एक नवी सुरुवात **
मी सहजच लिहिलेली चारोळी
साप्ताहिकात बक्षिसपात्र ठरली,
“मनातली एस. टी . सुसाट सुटते
भूतकाळातून तडक भविष्यात घुसते
स्मृतींचा कचरा डोंळ्यात शिरतो
ड्रायव्हर मधले थांबे विसरून जातो “
साहजिकच मनुष्य स्वभावानुसार
माणूस नेहमी भूतकाळात रमतो अन्
पूर्वीच्या चुका आठवून पश्चाताप दग्ध होतो व नंतर भविष्यातली स्वप्ने बघण्यात गुंग होतो पण वर्तमानात
डोकावून कधी नवी सुरुवात करत नाही.म्हणूनच स्वप्नरंजनातून फक्त
स्वप्न भंग नशिबी येतो.
सर्वसाधारणपणे सामान्य स्त्री च्या
आयुष्यात नवी सुरुवात होते ती तिच्या लग्नानंतर कारण नवं घर ,नवी
माणसं , नव्या चालीरीती , स्वभाव वगैरे व माझ्या ही बाबतीत हे सर्व होतेच पण अल्प काळात सावरले .
माझ्या आयुष्यात खरी नवी सुरुवात झाली ती ५०व्या वर्षी म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षात .
कशी ते खालील गोष्टी वरून समजेल , त्या थोडक्यात अशा –
१– **नवीन गाडी **—अलंकारने.
माझ्या मुलाने ५० व्या वाढदिवशी
मारुती ८०० गाडी भेट दिली ती मी
शिकले व नोकरीला जाताना वापरली
तसेच शिक्षकांना नेत असे , त्यामुळे त्यांची सोय झाली.
२–***तीन काव्य संग्रहांचे प्रकाशन ** *अ-ऋतुराज -सर्व प्रकारच्या गेय कविता
ब-कोण -कोणासाठी —चारोळ्या
संग्रह-
-क- प्रासंगिक-माणसाच्या आयुष्यातील सर्व प्रसंगावर कविता
३-*लेख लेखन **_मं. टा.त छापलेले अ -लग्नाची गंमत – पंगत
ब- गाडी माझी भारी -क-सेकंड इनिंग ड-फर्स्ट गिअर तसेच शालेय
स्मरणिकेत दर वर्षी कविता छापत .
४–**उपक्रम **—करोना काळात मनावरचा ताण कमी करण्यासाठी
नातेवाईक व मित्रमंडळींसाठी wa वर
२५ उपक्रम घेतले त्यात लेख कविता, चित्रकला,गायन यांचा समावेश त्यामुळे वेळ सत्कारणी
लागला व कला गुणांना चालना मिळे
५–*सूत्रसंचालन —**मी काव्यकुज व पिंपळपान या टीव्हीवरील कार्यक्रमाचे निवेदन केले
तसेच गायनाचे कार्यक्रम व शालेय
कार्यक्रम यांचे सूत्रधसंचालन केले
६–**वाढदिवस कविता **—
गेली चार वर्षे मी नातेवाईक व मित्र मंडळींच्या वाढदिवसानिमित्त कविता
करते . त्यामुळे ते आनंदित होतात
७-*काव्य व निबंध स्पर्धा **__मी
शिक्षकांसाठी असलेल्या स्पर्धेत सहभागी झाले व चारही वेळा बक्षिसे मिळवली
८-**दूरदर्शन कार्यक्रम ** -मी
काव्य गायनाचा काव्यकुंज कार्यक्रम
व मुलाखतीचा पिंपळपान कार्यक्रम
निवेदन. केले व सहभागी होतेच.
९-**कौटुंबिक -**मुलांचे शिक्षण, नोकरी,लग्न , .नातवाचा जन्म हे जरी
मुलांच्या आयुष्याची नवी सुरुवात
असली तरीही नातवाला सांभाळणे,
शिकवणे ही आपली पण नवी
सुरुवात असतेच . मी माझ्या मुलाचा व नातवाचा १०वी पर्यंत अभ्यास घेतला.नातवाला ९८ % १०वीत गुण
मिळाले. हा आनंद अवर्णनीय आहे
अशारीतीने माझा एक अनुभव
अजूनही वयाची ७३ वर्षं पर्यंत
आनंदात चालू आहे.
यावेळी मला गाणं आठवतं —-
**छोडो कलकी बातें,
कलकी बात पुरानी ,
नये दौरमें लिखेंगै ,
मिलकर नयी कहानी
हम हिंदुस्तानी ,हम हिंदुस्तानी
अनुराधा श्यामसुंदर भोगले
बोरिवली , मुंबई
मोबा. नं- ९८३३३४१३६२
