#माझ्यातली मी
#लघुकथा लेखन टास्क
@everyone
शीर्षक = परतीची पावलं
दशरथ बापू एका मोठ्या घरात आपल्या मुला-सुनां आणि नातवंडांसोबत राहायचे. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांच्या भावाचं घर होते.भाऊ नेहमी पायी वारी करणे देवाला जाणे. पण बापूंसाठी मात्र चार भिंतीचं घर आणि खिडकीतून दिसणारं अंगण एवढंच उरलं होतं.
एकाच छताखाली असूनही प्रत्येक जण आपापल्या जगात गुंतलेला असायचा. मुलगा-सून शेतातल्या कामाच्या गडबडीत, तर नातवंडं लॅपटॉप आणि फोनच्या स्क्रीनमध्ये हरवलेली.
बापूना नेहमी वाटायचं, कोणीतरी जवळ बसावं, जुन्या आठवणी काढाव्या, किमान ‘आज कसं वाटतंय?’ एवढं तरी विचारावं. पण सर्वांकडे ‘वेळेचं’ कारण असायचं.
एके दिवशी दुपारी एक भीषण बातमी आली. बापूंचे धाकटे भाऊ, जे त्यांच्या काळजाचा तुकडा होते, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना एवढा मोठा मानसिक धक्का बसला पण तरीही त्यांनी सर्वांना सावरलं पण कार्य पूर्ण झाल्यानंतर आजारी पडले.
त्यां दिवशीपासून बापू अंथरुणाला खिळले.ते फक्त एकच विचार करत मी आजारी असा तरी देवाने माझ्या भावास का नेले. आजारापेक्षा जास्त त्यांचे शरीर थकले होते. ते कुणाशीच बोलेनासे झाले. डॉक्टरांनी सांगितले, “शरीरापेक्षा मन जास्त खचलंय, यांना आता औषधांपेक्षा तुमच्या ‘वेळेची’ आणि ‘मायेची’ जास्त गरज आहे.”
मुलांना जाणीव झाली की, ज्या वडिलांनी त्यांना बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्यासाठी आपल्याकडे पाच मिनिटंही नसावीत? सून आवडीचा घास भरवू लागली, तर नातवंडं गोष्टी सांगू लागली. एक रात्री मुलगा सुधीर बापूंचे पाय चेपत असताना बापूंना गहिवरून म्हणाले, “सुधीर, आज तुझा वेळ मिळालाय, हेच माझ्यासाठी खरं औषध आहे.”सुधीर, तुझ्या काकांच्या जाण्याने मला समजलं की आयुष्य किती अनिश्चित आहे.”
सुधीरने वडिलांचा हात आपल्या हातात घेतला आणि रडत म्हणाला, “बापू, आम्हाला माफ करा. आम्ही कामाच्या मागे धावता धावता विसरलो होतो की, हक्काची माणसं कारण नाही, तर वेळ देतात. आता तुम्ही फक्त बरे व्हा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.”
घरात आता पहिल्यासारखा शांतपणा नव्हता, तर हास्याचे आवाज होते. बापूंच्या चेहऱ्यावरचं तेज परत आलं होतं, कारण त्यांना आता त्यांचं घर ‘घर’ वाटू लागलं होतं.
तात्पर्य: माणसाला म्हातारपणात फक्त सन्मान नको असतो, तर आपल्या हक्काच्या माणसांची साथ आणि त्यांचा थोडासा वेळ हवा असतो.
शब्दसंख्या 300 ~अलका शिंदे

