#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#कवितालेखनटास्क( ६/१/२०२६)
@everyone
नवी ओळख
माझीच मला मी अनोळखी भासले आरशात पाहताना,
चेहऱ्यावरचे प्रश्न वाढले, उत्तरे हरवली शोधताना.
का कधी असे घडावे माझीच मला मी नवी भासली
त्या आरशात स्वतःला निरखतांना
जरा जास्त जेव्हा जवळून स्वतःला बघितले
मनातले काहूर जवळून जाणवले
वाढत्या वयाच्या सुरकुत्यांनी अनुभवांचे बोल समजावले
नको अडकू आता परत परत या संसाराच्या व्यवहारात
दे वयाच्या परतीला आता तू जगण्यातील स्वार्थ!
हळूच खुणावले डोक्यावरील पांढऱ्या केसांनी
म्हणाले घे निवृत्ती आतातरी या मोहाच्या संसारातूनी
पेललेली ही जबाबदारी दे सोपवून पुढील पिढीकडे
आणि पावले वळव आता स्वतःच्याच संगोपनाकडे
कठीन वाटेल ही वाट चालतांना सुरुवातीला
पण लक्षात घे आता फक्त थोडाच श्वास कदाचित, असेल राहिला
निवृत्ती नियतीने देण्याआधीच घे exit कामातूनी
संसाराचा हा नियम ओळखून चाल तुझी जराशी बदलवून घे ना गडे
जुनी कात टाकल्यावर येईल गम्मत खरी
स्वतःला जपतांना जाणवेल काही दिवस पोकळी
या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कर तुझ्यासाठी
आणि पुन्हा नवी निर्मिती कर नव्या जगातील प्रत्येकासाठी
अनुभव असेल हा खास जो बदलेल तुझं मन झकास
Practically विचार करण्याची करशील तू मग सुरूवात
कामातील बंधनात न राहता तु घेशील मोकळा श्वास
त्यावेळी घे उंच भरारी आकाशात!!
घे उंच भरारी आकाशात!!
वय केवळ आकडाच असतो नाही त्याचा खूप जास्त त्रास
मन मात्र प्रफुल्लित ठेव स्वतःसाठीच्या या जगात
आनंदी मन सुदृढ ठेवेल तुला
मनातील जुन्या कळकट आठवणींनाचा साफ कर कोपरा
नव्या विचारसरणीचा मंत्र मनात जपत रहा
गेलेला प्रत्येक क्षण भूतकाळाताील कडू गोड असे सोहळा !
येणारा प्रत्येक नवा दिवस नवी उमेद घेऊन येईल
आणि नव्या आशा नवी क्षितिजे पार करण्याचे सामर्थ्य देईल
जाणीवपूर्वक कर त्यांचा स्वीकार मग घडेल बघ चमत्कार
आयष्यातील संधेला मिळेल नव्या उमेदीची किनार !
गोड होईल मग आयुष्याचा शेवट मन शांत असेल त्याही वाटेवर
साधा सोपा संदेश देऊनी मन हसले खुदकन
मुलगा मात्र बावरला मला अशी आरशात स्वतःशीच हसतांना पाहून !!
✍️र सि का
©® र सि का चवरे
PcSOURCE GOOGLE.
