#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी
#ब्लॉग_लेखन_टास्क (29/12/25)
#चुकांपेक्षा_व्यक्ती_जास्त_महत्त्वाची
“आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावेच लागते, चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.” हे वाक्य मी आईकडून शिकले. ती नेहमी म्हणायची, नात्यात क्षमा करता आली पाहिजे. हेच तर नाते संभाळण्याचे रहस्य आहे. आणि आज ते शीतल च्या आयुष्यात खरं ठरलं. ती अश्विनी, आणि तो रोहन – कॉलेजमधील शीतलचा प्रियकर. रोहन हसतमुख, तिच्या दुःखात साथ देणारा. पण त्याला वेळ पाळण्याची सवयच नाव्हती. शीतला भेटायला येताना. तो नेहमी उशीर करायचा. “ट्रॅफिक!” असं हसून सांगायचा.लग्न झाले छान संसार सुरू झाला आणि संसार वेलीवर फुल उमलले त्यानंतर
एकदा मात्र, त्याची चूक असह्य झाली. आमच्या परीचा पहिला वाढदिवस. तिने दिवसभर तयारी केली – घर सजवलं, त्याच्या आणि परीच्या आवडीचे पदार्थ बनवले. साडेसहा वाजता भेटायचं ठरलं. सात वाजले, आठ वाजले… फोन बंद. ती एकटी रडत बसले. “किती सहन करायचं?” मित्र म्हणाले, “सोडून दे.” पण तेव्हा आईचं वाक्य आठवलं: “आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावेच लागते, चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.” रोहनची चांगली बाजू आठवली – परीसाठी जो वेळेवर रात्रभर जागतो, माझ्या माझी स्वप्ने जोपासायला प्रोत्साहन देतो. चुका क्षणिक आहेत, पण तो माझा भाग.
दुसऱ्या दिवशी तो आला. “गाडी ब्रेकडाउन झाली, फोन केला पण नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.पण मी तुझ्यासाठी आणि परी साठी कसा आलो ते माझ मलाच ठाऊक.” डोळ्यात पश्चात्ताप दिसत होता. तिने त्याला मिठी मारली. “ते वाक्य खरं आहे, रोहन. तू माझ्यासाठी खास आहेस.” तेव्हापासून आम्ही बोलून चुका संपवतो.
प्रेम म्हणजे एकमेकांना जपणं.
(शब्दसंख्या: 218)
#30_12_2025_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

error: Content is protected !!