#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क ( 26/12/2025)
#गुडबाय2025
बॅडटच च दुष्टचक्र
अजूनही मला आठवतंय 31 डिसेंबर 2024 ची ती पार्टी . आम्ही सगळे मित्र एकत्र न्यू इयर सेलिब्रेशन साठी जमलो होतो. त्या पार्टीत माझा बेस्ट फ्रेंड कुमार थोडा मला अस्वस्थ वाटत होता म्हणून मी त्याला जरा बाजूला घेतल आणि त्याला विचारलं की तुझं अस्वस्थ राहण्याचं कारण काय काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा त्याने मला सांगितलं की माझी सहा वर्षाची मुलगी आहे आणि तिला थोडा प्रॉब्लेम आहे असं वाटतं आहे म्हणजे ती अभ्यास करण्यासाठी स्थिर राहत नाही आणि शाळेने सांगितलं की तिला बाल मानसोपचारतज्ज्ञ ह्यांना दाखवा .त्याच्यामुळे उद्या तिची मी अपॉइंटमेंट घेतली आहे मला जाम टेन्शन आलंय की डॉक्टर काय सांगतात ? तिला कुठल डीसऑर्डर नको निघायला म्हणजे मिळवल.. तेव्हा मी त्याला सांगितलं की तू काळजी करू नकोस मी ही तुझ्याबरोबर येईल कारण त्याची पत्नी दुसऱ्या कामात बिझी असल्याने येऊ शकणार नव्हती ..
दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेजण डॉक्टर सानिका खरें कडे त्याच्या मुलीला घेऊन गेलो .नंबर यायला वेळ लागणार होता म्हणून मी सहजच तिथे डॉक्टरांचे जे सर्टिफिकेट्स असतात आणि फोटोग्राफ्स असतात ते बघण्यासाठी म्हणून उठलो आणि माझ्या लक्षात आलं डॉक्टर सानिका म्हणजे माझ्या शाळेतल्या सानिका काळे.. सानिका आणि मी दहावीला एकाच वर्गात होतो.. सानिका दिसायला खूप सुंदर तेवढीच अभ्यासातही हुशार खूप मुलं तिच्या मागे होती..शाळेतलं ते बाळबोध वय, मला अजून आठवतो तो दिवस , मी एकदा सानिकाला जाणून बुजून जोरात धक्का मारला पण झालं काय की माझा धक्का तिच्या नको त्या ठिकाणी लागला त्यामुळे तिला खूप राग आलेला आणि तिने मला सगळ्यांसमोर दोन कानाखाली मारलेल्या आणि मला हेही सांगितलेलं होतं की मी आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करते की तू मला बॅड टच केलास .. तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि मी तिला सांगितलं चुकून झालं प्लीज माझी कंप्लेंट करू नको नाहीतर ते मला शाळेतून काढून टाकतील.. तिने मला सांगितलं की ठीक आहे आज तुला मी माफ करते पण याच्यापुढे कधीच असं वागू नकोस .कुठल्याही मुलींना असा कुठेही केलेला स्पर्श आवडत नाही तो त्या मुलीचा अपमान असतो .. मग मी तिला सांगितलेलं की मी शब्द देतो की याच्यापुढे मी मुलींपासून चार हात लांब राहील पण तू प्लीज माझी कंप्लेंट करू नको नाहीतर माझं सगळं दहावीचं वर्ष आणि माझं पुढचं सगळं करियर बरबाद होईल.. तिने त्याप्रमाणे ऐकलेलं.. आज ती सानिका एवढ्या दिवसांनी २०२५ च्या पहिल्या दिवशीच मला दिसणार होती..
सानिकाने मला ओळखलं नाही आणि मी ही तिला ओळख दाखवली नाही ..तिचा चांगलाच जम बसला होता ,खूप गर्दी होती तिच्या क्लिनिक मध्ये.
असेच तीन महिने निघून गेले. माझ्या मित्राच्या मुलीमध्ये सानिकाच्या ट्रीटमेंटमुळे फरक पडायला लागलेला ..
मला ही एकच मुलगी तन्वी अकरा वर्षाची ,स्वतःचा अभ्यास स्वतः अगदी लहानपणापासून करणारी . माझ्या बायकोच वर्क फ्रॉम होम जॉब त्यामुळे मला घरच जास्त काहीच करावं लागायचं नाही .. एक दिवस माझ्या बायकोने मला सांगितलं हल्ली मागच्या आठवड्यापासून तन्वी शाळेत जायलाच नाही म्हणते आहे ..रोज काही ना काही कारण सांगते कधी म्हणते पोट दुखत , कधी म्हणते डोकं दुखत , जास्त बोलत नाही , विचारलं तर उत्तर देत नाही , खाली खेळायला जात नाही , फक्त घरातल्या घरात असते ,खूप बावरलेली वाटते …मी तन्वी शी बोलायचा प्रयत्न केला तर माझ्याशी तर अजिबातच नीट नाही बोलली ..मी तिला म्हटलं चल तुझं आवडत आइस्क्रीम खायला , येताना छान शॉपिंग करूया तर माझ्याबरोबर एकटी यायला ही तयार होईना ..एकदम गप्प गप्प .. शाळेत काही झालं का हे खूप वेळा विचारलं पण काही सांगायला तयार होईना .. आम्ही जास्त फोर्स केला तिला बोलत करायचं म्हणून तर तिला त्या स्ट्रेस ने चक्क ताप आला ..आम्ही दोघे हि खुप घाबरून गेलो ..मला डॉक्टर सानिका ची आठवण आली ..आणि मी तन्वी साठी तिची अपॉइंटमेंट घेण्यासाठी गेलो ..
रिसेप्शनिस्ट ने अपॉइंटमेंट दिली पण मी डॉ सानिका ला मला आताच भेटायचं आहे , मी त्याचा स्कूल फ्रेंड आहे राजेश कदम अस मॅडमना सांगा आणि मला मॅडमला फक्त पाच मिनिट भेटू द्या अशी विनंती केली .. माझ्या नशिबाने सानिका ने मला तिला भेटायची परवानगी दिली ..
मी जेव्हा सानिकाला भेटायला गेलो तेव्हा खूप गोंधळलेल्या स्थितीत होतो .. तरी हिंमत करून बोललो ..
मी – सानिका ,सॉरी डॉ सानिका मी राजेश कदम..तुमच्यामुळे शाळेतून मला काढलं गेल नाही,मग दहावी झाली , इंजिनीयर झालो .. बट आय swear मी नंतर मुलींपासून चार हात लांब राहिलो ..लग्न ही आई वडिलांच्या मर्जीने केलं..
सानिका — ठीक आहे राजेश ,आता काय प्रॉब्लेम आहे ?
राजेश – माझी मुलगी अकरा वर्षाची आहे ..( आणि मी तिला तन्वी बद्दल सगळ सांगितलं )
सानिका – तू तन्वी ला घेऊन ये ,तिला बोलत करायची खूप गरज आहे . मी तुला तू म्हटलं तस तू ही मला तू म्हणू शकतोस .
राजेश – सानिका , मला खूप भीती वाटते आहे ,माझ्या तन्वी बाबत काही अनुचित घडलं नसेल ना ?
( माझ्या डोळ्यात पाणी आलं)
सानिका – तू काळजी करू नकोस,मी तन्वीला बरोबर बोलतं करेल .
राजेश – सानिका,माझ्या घरी येशील आज डिनरला ..तुझे मिस्टर त्यांना ही घेऊन ये .. प्लीज नाही म्हणू नकोस . मला असं झालं आहे की तू कधी एकदा तन्वी ला भेटते..
सानिका – पॅनिक नको होऊस राजेश ,मी येईन तुझ्या घरी जेवायला.. माझी ओळख तू तन्वीशी एक स्कूल फ्रेंड म्हणूनच करून दे कारण तसंच काही तिच्या बाबतीत झालं असेल तर मी तुझी मैत्रीण म्हणजे विरोधी जेंडर मधे देखील चांगली मैत्री असू शकते हा विश्वास तिला येईल … मी एकटीच येईल , माझे मिस्टर आज तरी नको कारण शक्यतो जो पर्यंत तन्वी च्या मनात काय चालू आहे ते कळत नाही तो पर्यंत तरी तू कुठल्याही मुलाला ,पुरुषाला घरी बोलवू नकोस ..
मी – थँक्यू सानिका ..आम्ही तुझी वाट बघू ..
ठरल्याप्रमाणे रात्री सानिका घरी आली .. येताना तन्वी साठी काही ब्रेनी गेम्स घेऊन आली , आमच्याशी थोड बोलल्या नंतर तन्वी शी गेम्स खेळायला लागली .. आम्हाला दोघांना हळूच खुण करून दुसऱ्या खोलीत जायला सांगितलं आणि चक्क अर्धा तास सानिका, तन्वी दोघी एकच रुम मधे होत्या ..
जेवताना खूप दिवसांनी अस वाटलं की तन्वी थोडीशी फ्री झाली आहे , छान गप्पा मारत होती ती ..
सानिकाने दुसऱ्या दिवशी आम्हाला क्लिनिक मध्ये बोलावलं आणि सांगितलं की मी तन्वीला खेळता खेळता बोलण्याच्या ओघात विचारलं की तुला कुठला खेळ आवडत नाही तिने सांगितलं की शाळेतले एक शिपाई काका खेळतात तो खेळ आवडत नाही .. ते शिपाई काका मुलींच्या छातीला घट्ट पकडून उचलतात आणि गरगर फिरवतात .. कधी कधी पकडलं पकडलं म्हणत मुलींना घट्ट मिठीत घेतात ..
सानिका चे बोलणे ऐकून तर माझी बायको रडायलाच लागली ..
सानिका – मी तन्वीला गुड टच, बॅड टच म्हणजे काय , कोणी बॅड टच केला तर काय करायचं ?मुख्य म्हणजे अजिबात घाबरायच नाही हे सगळं समजावून सांगितलं आहे .. ती त्याप्रमाणे ड्रॉइंग काढून दाखवणार आहे.. तुम्ही पालक म्हणून त्या शिपायाची तक्रार करा ..
दुसऱ्या दिवशी रीतसर शाळेत जाऊन प्रिन्सिपॉल कडे त्या शिपाई ची तक्रार केली , अजून दुसऱ्या पालकांशी संपर्क केल्यावर इतर मुलींनीही तेच सांगितलं ,त्यामुळे आम्ही शिपायाला बेदम चोप दिला आणि मग पोलिसात दिले..
तन्वी सानिका ची चांगली मैत्री झालेली , सानिका च्या सांगण्यावरून तन्वी रोज संध्याकाळी दिवा बत्ती या वेळी गणपती अथर्वशीर्ष ,गायत्रीमंत्र जप , आणि रोज पाढे म्हणायला लागली ..तन्वी स्वतःहून कराटे क्लास जॉइन करायचा म्हणून मागे लागली ..आता 2025 संपायला आलं, तन्वी मधे पुन्हा तो पूर्वीचा आत्मविश्वास आला , कराटे मध्ये तर एक्सपर्ट झाली ..
हे 2025 साल मी कधीच विसरू शकणार नाही , मला सानिका सारखी चांगली जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली .मी एकदा सानिका ला म्हटलं की जशी करणी तशी भरणी हा अनुभव मला ह्या वर्षात आला ..जी चूक मी शाळेत असताना सानिका बाबत केलेली तसच काहीसं माझ्या मुलीच्या बाबतीत झालं ..मी केलेल्या त्या बॅड टच च दुष्ट चक्र माझ्या मुलीपर्यंत आलं …कलियुग आहे , कर्माच फळ ह्या जन्माच ह्या जन्मीच भोगाव लागत ह्याचा प्रत्यय आला.. म्हणूनच 2025 ने हे नक्कीच शिकवलं की माणसाने कर्म कायम चांगल ठेवलं पाहिजे आणि ह्याच बाळकडू मुलांना दिलं गेलं पाहिजे .
2025 गुडबाय पार्टी साठी तन्वी ने चित्र काढलेलं आणि सगळ्या बच्चा कंपनीला टिप्स देण्यासाठी सानिका ला खास आमंत्रित करायचं असं एकमतानं माझ्या मित्र परिवारामध्ये सगळ्यांनी ठरवलं ..
सौ स्वाती येवले
