#माझ्यातलीमी # वीकेंड टास्क (26/12/25)

#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क (26/12/25)
#गुड_बाय_2025
#२०२५_च्या_निरोपाची_गोष्ट
कुणी तरी येणार, येणार म्हणतच… २०२५, तू कधी आलास आणि आता काय, तुला पण गुड बाय म्हणण्याची वेळ आली!
तुझ्या येण्याने एक आशेचा किरण उजळला, आणि बारा महिने – म्हणजे ३६५ दिवस – तुझ्याबरोबर घालवले. ते क्षण कायम स्मरणात राहतील.
जानेवारी महिना तर पहिला महिना, म्हणजे वर्षाची सुरुवात. पूर्ण महिना नवीन वर्षाच्या शुभेच्छांनीच गेला. सुरुवात शुभेच्छा घेऊन झाली – माझा वाढदिवस एक तारखेला, बघ विसरलास की काय? तर असो. एक जानेवारीला शुभेच्छांच्या माध्यमातून भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि बरच काही मिळाले.
दुसऱ्या महिन्यात लग्नाचा वाढदिवस, एनिव्हर्सरी – काय म्हणतात त्याला? त्यासाठी शुभेच्छांचा पुष्पगुच्छ यांचा पाऊसच पडला, फेसबुकवर! वर्षाचे दोन महिने तर संपले.
तिसऱ्या महिन्यात कोणाची ना कोणाची वाढदिवस, एनिव्हर्सरी – शुभेच्छा देण्यातच गेला.
प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या विषयांवर लेखन, कविता, चारोळ्या – हे तर चालूच होते. लेखन करताना कडू-गोड अनुभव आले; ते थोडेच चुकतात! दुसऱ्याला पाहिजे तसेच लेखन करायला जमले नाही.
तूच सांग ना, हे कसं शक्य आहे? एका हाताची बोटे सारखी नाहीत, तर विचार कसे एकत्र येतील? तूच सांग. त्यांना हवं तसं लिहायचं म्हणजे आपल्या कलेचं काय रे? लेखन हा एक विरगुळ आहे, आपल्या मनाचा. मन शांत राहावं, ते दुसऱ्यांमुळे ढवळून निघू नये. नुसत्या प्रमाणपत्रासाठी लेखन करणं खरंच जमत नाही. मनापासून वाटतं ते बेधडक लिहून मोकळं झालं की कसं हलकं हलकं वाटतं!
उगाच कुणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि आपटला म्हणून आनंद घ्यायचा – हे बरोबर नाही ना? अलक लिहायला तर व्यवस्थित जमतं, चारोळी सुद्धा चारोळीच झाली आहे असं वाटतं.
राहाटा-राहाट्याला प्रश्न कविता – तेच तर! तो पण यमक-चमक जुळवून लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. तुझ्या सोबतीने प्रयत्न सुरू केला आहे. मला वाटतं, छाती ठोकून नाही सांगता येत, पण प्रयत्न सोडणार नाही हे नक्की. कविता लेखन पण नक्की करीन.
यावर्षी पावसाने तर कहरच केला! मे महिन्याचा मजाच किरकिरा केला – ना आंबे खायला मिळाले, ना आइस्क्रीम. एक मात्र झालं – वर्षा ऋतूचा अनुभव आठ महिने घेतला! माणसासारखा ढसाढसा आकाशातून बरसून रडला हा पाऊस. गरीबांचे हाल झाले, ना त्यांनी कोणाकडे दाद मागावी? चालायचंच हेही नाही थोडक्यात. कारण जीवनात जर स्पर्धा नसतील तर जिंकण्याची किंवा हारण्याची मजा घेता आली नसती.
एवढ्यात जून-जुलैमध्ये पावसाची धडाका थांबला नाही; उलट, तो अधिक तीव्र झाला. नद्या-नाले फुटले, शेतं बुडाली, पण कुठेतरी आपलेच चुकतय याची जाणीव मात्र झाली – निसर्गाची ताकद ओळखण्याची. ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, त्या पावसातून एका नव्या सुरुवातीचा संदेश दिला. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दिव्याची आरास दिपोत्सवाने मनाला एक छान उजळा मिळाला – घरात सुख-शांती, तर बाहेर सर्वत्र आनंदाचा सोहळा साजरा झाला. पण, नेहमीप्रमाणे काही चिंता होत्या; आरोग्याच्या, नोकरीच्या, कुटुंबाच्या. तरीही, प्रत्येक आव्हानाना मन शांत ठेऊ न सामोरे जाण्याची ताकद गुरु च्या मार्गदर्शनामुळे मिळाली.
नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू झाली, आणि डिसेंबरमध्ये – हो, आज २९ डिसेंबर – तुझा निरोपाची वेळ. तू दिलीस ना त्या ३६५ दिवसांत? काही आनंद, काही धडपडी, काही शिकवण. लेखनाची मजा, कवितेची लेखना साठी प्रयत्नाचेआव्हान स्वीकार ले आहे, शुभेच्छांची वर्षाव –हे सगळं एकत्र गुंफून जळवून माझ्या कडून एक सुंदर कथा जणूं लिहून घेतलीस.
पण आता, २०२६ येऊ न दारात उभं राहील आहे. आता तुच मला सांग, तू कसा निरोप देऊ? की, जीवन हे एक सतत हमरस्ताच आहे 2025 तू आलास तुझ्या बरोबरीने 365 दिवस चालत आले आहे – कधी गोड, कधी कडू, आठवणी पण नेहमीच मनाला स्पर्श करणाऱ्या. पण एक गोड आठवण वर्षाच्या अखेरीस आमची #सोलरटेक_एनर्जी_कंपनी चालू झाली. असेच आगळे वेगळे प्रयत्न चालू ठेवणार, मन शांत ठेऊ, आणि प्रत्येक क्षणाला हसतमुखाने सामोरे जाणार. गुड बाय २०२५, आणि वेलकम २०२६! नव्या वर्षात नव्या स्वप्नांचा पाठपुरावा करणार, नवा लेखाजोखा लिहिण्यासाठी तर तुला हळूच बाय म्हणते तुझी आठवण कायम स्मरणात राहाणार एक एक वर्ष आयुष्यात न मिस झालं बाय… बाय 2025
#29_12_2025
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

error: Content is protected !!