चकवा…

# लघुकथा टास्क

‘ माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी
योग्य काय आहे याचीही समज रहात नाही. ‘ हे वाक्य वापरून लघुकथा. (२२/१२/२५)

चकवा…..

सुजय बारावीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. म्हणून घरच्यांनी एक पार्टी ठेवली होती. सर्व नातेवाईक, मित्र मंडळी तसेच आई बाबांच्या ऑफिस मधले असे बरेच लोक पार्टीला आले होते. प्रत्येकाचा एकच प्रश्न पुढे काय करायचे ठरवले आहेस? सुजय म्हणाला, अजून काही ठरवले नाही. वेगवेगळ्या कोर्सची माहिती गोळा करतोय. त्याचा राजू मामा म्हणाला, मी सांगतो, तू फार्मसीचा कोर्स कर मस्त मेडिकलचे दुकान सुरू कर. या व्यवसायात कधीही मंदी येत नाही. हल्ली आजार इतके वाढलेत की, त्याला औषधांशिवाय पर्याय नाही. त्याचा मनिष काका म्हणाला, अरे त्यापेक्षा व्हेइकल दुरूस्तीचा कोर्स कर. गॅरेज टाक हाताखाली चार पाच माणसे ठेव. अरे हल्ली घरोघरी टू व्हिलर व फोर व्हिलर गाड्या असतात आणि आपल्याकडचे रस्ते म्हणजे गॅरेजला मिळालेलं वरदान आहे. माझ्या मित्राचे आहे ना मी स्वतः बघितले आहे किती गर्दी असते ते.

त्याचा चुलत भाऊ पवन म्हणाला, हि असली कामं करण्यापेक्षा कम्प्युटर शिक हल्ली नवीन AI जोरात आहे. प्रत्येक गोष्टीत याचा वापर होतोय. आईची मैत्रीण डिसुझा म्हणाली, तू हुशार आहेस, डॉक्टर हो. एकाने सुचवले तू सिव्हिल इंजिनिअर हो, एकाने सुचवले तू सीए हो, कोणी वकील होण्याचा सल्ला दिला. असे प्रत्येक जण त्याला सुचवत होते. ते ऐकताना सुजयला जाणवले की, हल्ली आधी सारखे ठराविक अभ्यासक्रम नसून भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. पण…. त्यामुळे मी कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. एकाचा विचार केला की, दुसरा खुणावतोय. आपल्या निर्णयावर आपलाच विश्वास नाही. एखादा माणूस चकवा लागल्या सारखा गोल गोल फिरत रहातो त्याला योग्य मार्ग सापडत नाही तसेच माझे झाले आहे. या अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने माझे मलाच समजे नासे झाले आहे.

शब्द संख्या : २६५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!