#माझ्यातली मी.
#विकएंड टास्क.
#लग्न -सोशल स्टेटस शो _–
सस्नेह 👏परिवार.
**लग्न पवित्र सोहळा -दिखावा.?
दोन कुटुंबाना जोडणारा, दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारा हा विधी. आपल्या हिंदू संस्कृती नुसार दोन जीव
एकत्र येत नाहीत. तर त्यान्च्यावर एक सामाजिक, कौटुंबिक
जबाबदारी येत असते. नात्यात गोडवा निर्माण करून संतती
निर्माण करणे. हा एक हेतू असतो. सर्व विधी आपल्या ज्ञाती
नुसार होणं गरजेचं आहे. त्या प्रत्येक विधी मागे दडलेला
संकेत /कारण जाणून घेऊन नव दम्पत्तीने नव्या जीवनाची
सुरुवात करावी. असं सारं असताना आज काल लग्न हा सोहळा न राहता आपल्या प्रतिष्टेचं सिम्बॉल झालं आहे.
लग्नात केला जाणारा आवाच्या सवा खर्च. कधी वधू पित्याला
कर्ज बाजारी बनवतो. ज्यान्च्या कडे आहे पैसा त्यानां ह्याच
काही वाटणार नाही.
पण सर्व सामान्य पित्याला हे अवघडच आहे. ज्या
मुलीला जन्म दिला, तीचं लालन पालन केल ती चांगल्या घरी
पडावी ही प्रत्येक बाबांची इच्छा असतेच. मग् त्या साठी प्रसंगी घर, शेत, जमीन सावकाराकडे, बँकेकडे गहाण पडते.
मुलाच्या ही बाबतीत असं होत. शिकला असेल पण शेती दुकान असं काही करतो म्हटले की मुली नाकारतात.त्यांना
नोकरीवाला गळेलठ्ठपगारदार असणारा नवरा हवा असतो.
काही गरीब बाबाला मुलगीच लग्न म्हणजे अवघड प्रसंग
असतो. मग् मुलगी कितीही चांगली असली तरी मागे पडते
परिसस्थिती /किंवा तिच्या अपेक्षा मुळे.
मुलांनाही देखणी, मॉर्डन मुलगी बायको हवी. सारी हौस
मौज व्हावी ही इच्छा असतेच. समाजात खरं तर ही विषमता
निर्माण का निर्माण होते.
***सोशल मीडिया.
टीव्ही या सारख्या माध्यमातून दाखवले जाणारे काल्पनिक
अतिभव्य सोहळे. इव्हेंट्स चं अट्रॅक्शन असत. त्या साठी हट्ट
धरला जातो.
***आपल्या कडे किती संपत्ती आहे याचा दिखावा करण्याची
हौस. कोणी इतकं केल मग् आपण त्या पेक्षा जास्त सरस दाखवावं ही चढाओढ.
***कधी खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी, मग् कर्ज बाजारी झाले तरी हरकत नाही हा विचार.
या सारखी मूलभूत कारणे.
वस्तू स्तिती समजून घेऊन त्या प्रमाणे वागणे जमायला हवं.
उगाच जास्तीच्या खर्चाला आळा बसायला हवा. हे मुलगी मुलगा दोघांनीही समजून घ्यायला हवे. साध्या सोप्या पण सर्व विधीचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा प्रसंग
पार पडला पाहिजे. जेवण हॉल, सजावट यावर कितीतरी खर्च होतोच. तोच थोडा आपल्या ऐपती प्रमाणे करायला हवा.जास्तीचा खर्च न करता तोच पैसा एखाद्या गरीब गरजू ला मदत रूपात दिला तर. किंवा मुलीच्या वा मुलाच्या नावाने त्यांच्या भविष्याच्या विचारकरून बँकेत ठेवला तर. असा विचार व्हायला हवा.
आजकाल मुली मुले सुशिक्षितच असतात त्यांनी या गोष्टींचा विचार करावा.केवळ दिखाव्या साठी पैसा खर्च करणे म्हणजे सामाजिक विषमतेत भर टाकणे असं ही होत. असो
शेवट काय तर तरुण पिढीने विचारी व्हावं इतकंच.
अंजली मुरडिओ.


अप्रतिम लेख