#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#लघुकथालेखनटास्क (१५/१२/२५)
@everyone
**** भक्ती *****
भक्ती आणि भक्तीची आई दोघेच घरी राहतात. भक्तीचे वडील लहानपणीस वारले.त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी तिच्या आईवरती.आईने खूप कष्ट केले तिच्या आईच एकच ध्येय मुलीला खूप शिकवायचं,मोठं करायचं स्वतःच्या पायावर उभं करायचं, तिच्यासाठी चांगलं स्थळ बघायचं.आईच स्वप्न पूर्ण होत,भक्तीला तिच्या आईच्या कष्टाची जाणीव असते खरं म्हणजे तिला चांगली नोकरी मिळाल्यावर लग्न करायचं नसत कारण ती गेल्यानंतर तिच्या आईचं कसं होईल? पण शेवटी आईचं मन असतं ती भक्तीच लग्न लावून देते.
लग्न झाल्यानंतरच काही दिवसातच तिच्या लक्षात येत की त्यांची पूर्ण फसवणूक झालेली आहे.मुलगा लफडेबाज,व्यसनी,बेरोजगार आहे.त्याच्या आई-वडिलांचा काहीच त्याच्यावरती कंट्रोल नव्हता. लग्न टिकवण्यात काहीच अर्थ नव्हता. लग्नानंतर मोजून अकरा महिन्यात घर सोडून भक्ती आईकडे परत आली आणि तिने घटस्फोटाचे नोटीस त्याला पाठवून दिली.तिच्या आईला खूप दुःख झालं.भक्ती म्हणते,”जाऊ दे ना आई ,असं समजायचं की काही नाती ही भाड्याच्या घरासारखीचअसतात. माझा त्या घराशी असलेला अकरा महिन्याचा करार संपला .”
लग्नाआधी ती जिथे नोकरी करायची तिथे ती पुन्हा जाते. नोकरीवरती घेण्यासाठी विनंती करते तिचं काम होतही. नोकरी मिळते पण घरी आई रडत बसणार ह्या विचारात ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जाते तेव्हा तिला कळते नेहमीचे कॅन्टीन चालवणारे सोडून जात आहेत त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून कॅन्टीन बंद होणार आहे .कॅन्टीनमध्ये स्वामी समर्थांचा छान फोटो असतो. अचानक तिचं लक्ष त्या फोटोकडे जात आणि एक नवीन प्रेरणा सुचते , ज्यामुळे आईही दिवसभर सोबत राहू शकेल. ती परत ऑफिसमध्ये जाऊन विनंती करते नोकरीपेक्षा मला तुम्ही हे कॅन्टीन चालवायला परवानगी द्या.रीतसर पेपरवर्क करून ती,तिची आई दुसऱ्या दिवसापासून कॅन्टीन चालवायला सुरुवात करतात ते फक्त कॅन्टीन चालवत नाहीत तर त्यांच्या दोघींच्याही हाताला छान चव असते त्यामुळे त्या अनेक बायकांच्या हाताला काम देऊन त्यांचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतच जातो.तिचा संसार मोडला तरी तिच्यामुळे कितीतरी बायका त्यांच्या संसाराला हातभार लावू शकतात.उत्कृष्ट उद्योजिका म्हणून भक्तीचा गौरव होतो जेव्हा भक्तीला विचारलं जातं की तू हे सगळं कसं साध्य केलं तेव्हा ती म्हणते की एक म्हणजे माझी माय आणि दुसर म्हणजे
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या -300
टिप… कितीही संकट आली तरी त्या सर्वोच्च ईश्वरी शक्तीला भक्ती ,श्रद्धेने शरण गेल तर नक्की काही तरी मार्ग मिळतोच ..


👌👌
सुंदर कथा
Yo, check out m333mx! Seriously, I stumbled upon this the other day and it’s got some cool features. Definitely worth a peek for something different. What do you guys think? m333mx