भाड्याचे नाते

inbound8481725834587950972.jpg

#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन(१५/१२/२०३५)
#भाड्याचे _नाते
#स्वप्नीलकळ्या🥀
#विषय:—काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात कितीही जपली तरी ती आपली होतच नाही.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
(जुन्या काळातील सत्यघटनेवर आधारीत कथा)
#भाड्याचे_नाते
सुमन जन्माला आली तेच मुळी कमनशिबी म्हणून ! तिच्या पाठीवर दोन वर्षातच आईला पुन्हा दिवस राहिले.गांवात फार काही सुखसुविधा नसल्याने बाळंतपणात आई व नवीन बाळाचा मृत्यू झाला.
दोन वर्षाची सुमन… तिचा बाप तरी तिची देखभाल कशी करणार होता?. पण काहीतरी सोय करावीच लागणार होती. शिक्षकाची नोकरी सोडून सुमनची देखभाल करणे अशक्य गोष्ट होती.
बालविधवा माईआत्याला त्याने हिचा काही दिवस सांभाळ करशील कां ?असे विचारले. ती ही निपुत्रिक! तिने लगेच संमती दर्शवली आणि सुमनची रवानगी माईआत्याच्या घरी झाली.
तिची आर्थिक स्थिती चांगली व घरात विरंगुळा म्हणून एक गोड मुलगी आल्याने सुमनचे बालपण खूप कोडकौतुक व आनंदात गेले.
इकडे तिच्या बापाने दुसरे लग्न केले पण हिला सोबत आपल्या घरी नेण्याचा कधी विचारही केला नाही.क्वचितच कधीतरी येऊन भेटून जायचा.पण बापाचे जे काही प्रेम व मुलीची ओढ असते ती काही त्याच्या वागण्या व बोलण्यातून दिसत नसे.
शाळेत तुझे आई बाबा कोण असे विचारले की ,”माझी माईआजीच माझी आई व बाबा आहेत ” असेच सुमन सांगायची.
इकडे माईआत्याचे आयुष्यही सुमन आल्याने सुगंधीत झाले होते.त्यामुळे तिने सुद्धा सुमनला तुझ्या घरी कधी नेतोस असे विचारले नाही. बघताबघता सुमनने मॅट्रिकची परीक्षा देण्याची वेळ आली.त्यावर्षी कसे काय बापूला वाटले की सुमनला आपल्या घरी घेऊन जावे व उन्हाळ्यात तिचा अभ्यास करून घ्यावा.
आजपर्यंत ती कधी तिच्या वडिलांच्या घरी गेली नव्हती . माईआत्याने विचार केला बाप स्वत:हून अभ्यास करवून घेतो म्हणतो तर पाठवायला काही हरकत नाही.किती झाले तरी ती त्याचीच पोरगी आहे. सुमनची तर मनातून अजिबातच इच्छा नव्हती पण…
तिथे गेल्यावर सुमनचे मन काही रमेना. तिला सारखी माईआजीची आठवण यायची.अभ्यासातही लक्ष लागायचे नाही. सावत्रआई आणि वडिलांचे मन जपायचा तिचासारखा प्रयत्न चालू असे. कारण आजीने तिच्यावर तसे चांगले संस्कार जे केले होते!
सावत्रआई व वडिल वाईट जरी वागत नव्हते तरी फार काही प्रेमानेही बोलत नसत. त्यांच्या वागण्या- बोलण्यात अलिप्तपणा असायचा.
थोड्याच दिवसात सुमनला जाणवले की काही नाती ही कितीही मनापासून जपली तरी ती आपली होतच नाहीत ती भाड्याने घेतलेल्या घरासारखीच असतात.
आजीच्या इच्छेखातर तिने कसेबसे दोन महिने वडिलांच्या घरी काढले . पुढे ही लग्न होईपर्यंत वडिलांनी तिला घरी नेण्याचा कधी आग्रह केला नाही. आजीनेच तिचे लग्न करून दिले व लग्नानंतर तर त्यांच्या नात्याला कायमचा पूर्णविरामच मिळाला.
(३१०शब्द)
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!