स्वरगंधर्व बाबूजी

IMG_20251213_184526.jpg

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क(१२/१२/२५)
#म्यूझिकशोलेखनटास्क
@everyone
#बाबूजी
#सुधीरफडके

रामायण लिहिले ते वाल्मिकी ऋषींनी ..पण गीत रामायण म्हटलं की आठवतात ते बाबूजी ..

सुधीर फडके गाण रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ मध्ये पोहोचले आणि
गाणं लिहिलेल्या ओळींचा कागद द्या असं बाबूजी सुधीर फडके माडगुळकरांना म्हणाले. तोच माडगुळकर हडबडले, लिहिलेला कागद मी तुझ्याकडे दिला असं ते म्हणाले. मी कागद तुझ्याकडे दिला असं बाबूजी म्हणाले. माडगुळकर आणि बाबूजी यांच्यात स्टुडिओमध्ये भांडण सुरू झालं.यावर तोडगा काय तर माडगुळकरांनी पुन्हा लिहायचं आणि सुधीर फडकेंनी त्याला पुन्हा चाल द्यायची. माडगुळकारांनी काही वेळातच ते गीत पुन्हा लिहिलं, लिहिलेला कागद बाबूजींच्या हातात दिला. बाबूजींनी देखील काही मिनिटांत त्या गीताला नव्याने चाल बांधली आणि थेट स्टुडिओत रेकॉर्डिंग केलं. बाबूजींनी गाण्याची पहिली ओळ गायली आणि बाहेर उभ्या असलेल्या माडगुळकारांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी गदिमा आणि फडके यांच्या जोडीनं भारतीय संगीत विश्वात अजरामर अशा कलाकृतीला जन्म दिला होता आणि ते गीत होतं,” स्वयें श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती” ..

खरोखरच धन्य ते गदिमा आणि धन्य ते बाबूजी ..किती प्रतिभावान संपन्न,जे शब्दात व्यक्त करण कठीण ..
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौलिक प्रतिभेचा आविष्कार म्हणजे ‘गीतरामायण’..

गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे संगीत या जोडगोळीने मराठी श्रोत्यांना एक दैवी अनुभव दिला.

मनाला भिडणारे शब्द आणि हृदयाला भक्तीचा ओलावा देणारे संगीत यामुळे हे गीतरामायण अजरामर झाले आहे.

राम जन्माला ग सखी राम जन्माला” हे गीत श्रीरामाच्या जन्माच्या सोहळ्याचे वर्णन करते, ज्यात कौसल्या मातेच्या आनंद आणि राजवाड्यातील उत्साहाचे सुंदर चित्रण आहे. हे गाणे चैत्र महिन्यातील रामनवमीला गायले जाते . एक सुंदर, भावनात्मक आणि उत्साहाने भरलेले सादरीकरण आहे.

अनेकांनी याला मराठी भाषेला आणि रामभक्तांना मिळालेली एक दैवी देणगी मानले आहे,

आकाशवाणीवर प्रसारित झालेल्या या कार्यक्रमामुळे अनेक पिढ्या घडल्या, त्यांच्यात भक्ती आणि चांगुलपणा रुजला,
त्याबद्दल त्यांचे उपकार कोणीच फेडू शकत नाही.

सुधीर फडके यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा वापर करून गीतांना अजरामर केले. यामुळे प्रत्येक भावनेला योग्य न्याय मिळाला,

सुधीर फडके ह्यांना
बाबूजी या नावाने ओळखले जाते.त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीतआहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली..

यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तीगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या ‘प्रभात चित्र संस्थे’त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले ‘गदिमां’चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते.

बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत.
गोकुळ ,आगे बढो ,सीता स्वयंवर ,अपराधी ,जय भीम,
माया बाजार ,राम प्रतीज्ञा
,संत जनाबाई ,श्री कृष्ण दर्शन ह्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे..

आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी ‘वीर सावरकर’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट

बाबूजीना अनेक पुरस्कार मिळाले आहेत..
राष्ट्रपती पदक (१९६३) – हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी. शिवाय
सह्याद्री स्वररत्न पुरस्कार , दिनानाथ मंगेशकर पुरस्कार ,
लता मंगेशकर पुरस्कार , आल्फा जीवन गौरव पुरस्कार

गोव्याच्या मुक्तीसंग्रामात मोठा धोका पत्करुन ते सहभागी झाले.

“जगाच्या पाठीवर” हे अपूर्ण रहिलेले त्यांचे आत्मचरित्र ,दुर्दैवाने आजारपणामुळे हे आत्मचरित्र अपूर्ण राहिले.
ह्या माणसाने आयुष्यात इतकी गरीबी पाहिली असेल असे वाटले नव्हते. अक्षरशः हातावर पोट. भूक शमवायला ही अन्न नव्हते. पण संगीतातील प्रतिभेच्या जोरावर इतकी मोठी मजल मारु शकले हे मोठे कर्तृत्व. ..म्हणूनच बाबूजींचा गरिबीतून यशदायी कर्तृत्वाकडे जाणारा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे , स्फूर्तीदायक आहे, मनाला भावणारा आहे…..गीत रामायण च्या अमृत रसात मराठी भाषेला आणि मराठी जनतेला चिंब करणाऱ्या बाबूजीना माझे आदरयुक्त अभिवादन..

सौ स्वाती येवले

666 Comments

  1. खूप छान वर्णन गीत रामायण च आणि ते सुरेल संगीतात संगीतबद्ध करून गाणाऱ्या बाबूजींचं अर्थात सुधीर फडकेंच

  2. Site web 1xbet apk rdc – paris sportifs en ligne sur le football et autres sports. Propose des paris en direct et a l’avance, des cotes, des resultats et des tournois. Description detaillee du service, des fonctionnalites du compte et de son utilisation au Congo.

  3. Site web de pari foot rdc: paris sportifs, championnats de football, resultats des matchs et cotes. Informations detaillees sur la plateforme, les conditions d’utilisation, les fonctionnalites et les evenements sportifs disponibles.

  4. Alright, folks, let’s talk 32win13. So, I was a bit skeptical at first, but gotta say, pretty decent experience overall. Smooth navigation and a good selection of games. Could use a little more variety in promotions, but hey, what can you do? Check it out for yourself: 32win13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!