लतादीदी (लता मंगेशकर)

inbound2923193959410294638.jpg

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क(१२/१२/२५)
#म्यूझिकशोलेखनटास्क
@everyone
#आवडती_गायिका
#लतामंगेशकर

लतादीदी (लता मंगेशकर)
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

नावातच जादू आहे.. गेली आठ शतके आपल्या गोड गळ्याने सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडणारा आवाज.. गान कोकिळा, क्वीन ऑफ मेलोडी अशा पदव्या प्राप्त असलेली मराठमोळी गायिका.. दुसरी तिसरी कोण असणार ..!!.. लता मंगेशकर च.. माझी खूप खूप खूप आवडती गायिका.. आणि क्षणोक्षणी तिच्या मधुर, आर्जवी, भावनिक आवाजाने आतून बाहेरून हलवून टाकणारी.. लतादीदीच..!!

“मेरी आवाज ही पहचान है..” गाणाऱ्या लता चा आता फक्त आवाजच उरलाय..! ६ फेब्रुवारी २०२२ ला ती जगाचा कायमचा निरोप घेऊन गेली, असं वाटलं की आपल्या घरातीलच कुणीतरी गेलंय.. मूक सन्नाटा. तेव्हापासून तिच्यावर लिहिण्याची खूप इच्छा होती जी आज पूर्ण होतेय.. इतक्या प्रसिद्ध, प्रतिभावान गायिकेला मी एकेरी संबोधते.. कारण ती जवळची वाटते.. आपली वाटते.. आणि एकेरी संबोधनात आत्मीयता जास्त असते.. तशी आत्मीयता वाटते तिच्याबद्दल.

“ये कहाँ आ गये हम.. ” गाणारी लता या जगात आली २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात. त्यांचे जन्मनाव हेमा असे होते. वडील प्रसिद्ध नाटककार,‌गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर तर आई शेवंताबाई (माई मंगेशकर), चार भावंड.. मीना, आशा, उषा या बहिणी तर सगळ्यात लहान हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्या वडिलांनी एका नाटकातील स्त्रीपात्र लतिका या नावावरून तिचे नाव लता ठेवले. लता सर्व भावंडांमध्ये मोठी. तिला गायनाचे सुरुवातीचे धडे तिच्या वडिलांकडून म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने तिच्या वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये (मराठीतील संगीत नाटक) अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली . मात्र पुढे १९४५ ला मुंबईला आल्यानंतर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण तिने उस्ताद अमान अली खान यांच्याकडे घेतले. संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी त्यांना गायिका म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांची ओळख निर्माते शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली, जे त्यावेळी शहीद (१९४८) या चित्रपटावर काम करत होते , परंतु मुखर्जींनी त्यांचा आवाज “खूप पातळ” म्हणून नाकारला. नाराज हैदर यांनी उत्तर दिले की येत्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक “लताच्या पाया पडतील” आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये गाण्यासाठी “तिला विनवणी” करतील. आणि त्यांचे शब्द काही वर्षातच खरे ठरले.

लहान वयातच लता चे सूर एकदम पक्के होते. जणू सरस्वतीचेच सूर होते ते. जास्त रियाज न करताही तिचा सूर बरोबर लागायचा.. वरदानच असावं तिला तसं..!! या बाबत हृदयनाथ मंगेशकरांनी तिच्याबद्दल सांगितलेला एक प्रसंग आठवतो. लता ८,९ वर्षांची असेल. तिच्या वडिलांची तब्येत बरी राहत नव्हती. त्यामुळे त्यांची नाटक कंपनी बंद पडेल की काय अशी परिस्थिती होती. पैशांची चणचण असायची. औषधांना गुण येत नव्हता. त्यामुळे पैशांची थोडी व्यवस्था करावी म्हणून ते लताला घेऊन सोलापूर ला गेले. जिथे त्यांची नाटकांना बराच चांगला प्रतिसाद मिळायचा, काही ओळखीचे धनाढ्य व्यापारी होते .. त्यांच्याकडून मदत होईल असे वाटले. मदत तर नाही मिळाली पण त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांना एकदिवस थांबण्याची विनंती केली आणि दुसऱ्या दिवशी एखादा गायनाचा कार्यक्रम घेऊ त्यातून पैसे जमतील याची खात्री केली. आणि कार्यक्रम ठरला. निमंत्रणे गेली .. पण जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत गेली दीनानाथांची तब्येत परत बिघडली. वेळेवर कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हते. आता काय .. ?? दीनानाथ म्हणाले .. “लता गाईल..” सगळ्यांना वाटले ..एवढीशी चिमुरडी काय गाणार..!! पण पर्याय नव्हता. आणि त्या रात्री लताने स्टेज जिंकला. वाहवा .. चा वर्षाव झाला.. एवढ्या लहान वयात कुठल्याही प्रकारचा रियाज केलेला नसताना.. आपण आता म्हणतो तसं ऑन द स्पॉट .. तेही शास्त्रीय संगीत.. लता च करू शकते.

त्या वेळी लता ८,९ वर्षाची होती. आता कुणालाही वाटेल आता ३,४ वर्षाची मुलंही छान गातात.. आताची पिढी खरच खूप स्मार्ट आहे.. ती माहिती तंत्रज्ञानाच्या जगात जगतात. पण तेव्हाची परिस्थिती, समाज, लोकांची आवड, पारख वेगळी होती. त्यामुळे लताचं हे कर्तृत्व अनमोल होतं. आवडीसाठी नाही तर वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी, त्यांचा मान जपण्यासाठी ती पुढे आली.

ती १३ वर्षांची असताना १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यावेळी नवयुग चित्रपट कंपनीचे मालक आणि मंगेशकर कुटुंबाचे जवळचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांची काळजी घेतली. त्यांनी तिला गायिका आणि अभिनेत्री म्हणून कारकिर्द सुरू करण्यास मदत केली. घरी सर्वात मोठी असल्याने या तेरा वर्षाच्या मुलीने घराची आणि भावंडांची जबाबदारी घेतली. तिने स्वतःच्याच एका मुलाखतीत सांगितले “गाणं” तिच्या जगण्याचं एकमेव साधन होतं.. इच्छा असो वा नसो गरजेपोटी तिने गायनास सुरुवात केली.

वसंत जोगळेकर यांच्या ‘किती हसाल’ (१९४२) या मराठी चित्रपटासाठी सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेले “नाचू या गडे, खेलू सारी मनी हौस भारी” हे गाणे गायले होते, परंतु ते गाणे अंतिम टप्प्यातून वगळण्यात आले. विनायकने तिला नवयुग चित्रपटाच्या ‘पहिली मंगला-गौर’ (१९४२) या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली, ज्यामध्ये तिने दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेले “नटली चैत्राची नवलाई” हे गाणे गायले, जे तिचे पहिले चित्रपट गीत होते तर पहिले हिंदी गाणे ‘ गजाभाऊ ‘ (१९४३) या मराठी चित्रपटातील “माता एक सपूत की दुनिया बदल दे तू” हे होते. गायनाच्या क्षेत्रात लताचे पाय रोवू लागले. हळूहळू ती नावारूपाला येऊ लागली ते “आयेगा, आयेगा, आयेगा अनेवाला..” या ‘महल’ या चित्रपटातील गाण्यापासून ..

लतादीदींच्या गाण्यात जे आर्जव, ज्या भावना, जी तळमळ, जी मनाची अवस्था, जी आर्तता, जो उद्वेग, जो आनंद, जे दुःख दिसतं, अनुभवायला येत ते इतकं खरं, इतकं हृदयापासून असतं की ते आपणच अनुभवत आहोत असं वाटतं. मग ते “लग जा गले”, “इक प्यार का नगमा..”, “नैना बरसे..”, “तेरे बिना जिंदगी से..”, “रसिक बलमा..”, कुठलीही असो आपण त्यात हरवून जातो. भक्तिगीत, भावगीत, देशभक्ती गीत, नाट्यगीत, अभंग, विराण्या, स्तोत्र साऱ्याच गायन प्रकारात गायन केलेल्या लतादीदीने तिच्या आयुष्यात ३०००० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांच्या जीवनातील सुरुवातीची दहा आणि शेवटची दहा वर्षे सोडली तरी या आकड्यावरून त्यांनी ७२ वर्षात रोज कमीत कमी एक गाणं गायलं असेल. किती ती नियमितता..!

“ऐ मेरे वतन के लोगो ..” हे त्याचं अजरामर गाणं ऐकून हृदय आणि मन हेलावून सोडते. हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तसेच “तू छुपी है कहाँ..” या युगल गीतातील लताने लावलेला सूर, तान आपल्याला कुठच्या कुठे घेऊन जाते. “तुझसे नाराज नहीं ये जिंदगी ..” हे गाणं नायिकेची अवस्था सांगून जाते, “दिल है के मानता नही..”, “दिल दिवाना बिन सजनाके..”, “मेरे ख्वाबों में जो आए..” ही तरुण नायिकेवर चित्रित केलेली गाणी लता दीदीने वयाच्या ६०+ नंतर गायलीत हे खरं वाटत नाही .. इतकी व्हरायटी असणारा आवाज दैवी देणगीच म्हणावी लागते.

ज्ञानेश्वर माऊली मधील हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेले ज्ञानेश्वरांचे अभंग “पैलतोगे काऊ कोकताहे”, “मोगरा फुलला”, “रंगा येई वो” इत्यादी लताच्या आवाजामुळे भक्तीची उंची गाठत आपल्याला थेट भगवंतापर्यंत घेऊन जात आहे असच वाटतं. आणि हीच गाणी आहेत ज्यामुळे मी लतादीदी ची फॅन झाले. लहान असताना जेव्हा टीव्ही, इंटरनेट, डिजिटल मीडिया असं काही नव्हतं रेडिओ हेच मनोरंजनाच साधन होतं त्यावेळी पहाटे ही गाणी रेडिओवर लागायची. दिवसाची सुंदर सकाळ रेडिओवरील लताच्याच आवाजातील “वंदे मातरम्..” आणि त्या नंतर भक्तिगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर माऊली मधील एक दोन गाणी किंवा गणेश वंदन ऐकूनच व्हायची. लताचा जसा सूर असेल तसा दिवस जायचा,उत्साही असेल तर आनंदी आणि दुःखी असेल तर चिंतेत.. त्यामुळेच तीच राज्यच होतं माझ्या मनावर. पुढे परिस्थिती बदलत गेली.. मोठं होताना हळूहळू तशी भावनिकता कमी होत गेली पण लताच्या सुरांनी, आवाजाने, गाण्यांनी नेहमीच तजेलदारपणा मिळत राहिला. आत्ताही लताचं गाणं ऐकलं की सगळे टेन्शन, स्ट्रेस, बेचैनी दूर होते.

लतादीदीने फक्त हिंदी मराठीच नाही तर तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्येही गाणी गायली आहे. भाषा समजली नाही तरी ते सूर समजतात आणि आनंदच देऊन जातात. फक्त गायनच नाही तर आनंदघन या नावाने तिने अनेक गाण्यांना संगीतही दिलंय..साधी माणसं या चित्रपटाचे संगीत तिनेच म्हणजे आनंदघन ने दिलंय.

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल १९६९ मधे पभूषण, १९९९ मधे पद्मविभूषण आणि २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द लीजन ऑफ ऑनर”ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

स्वभावाने अत्यंत साधी, मनाने नम्र, शिस्तप्रिय, वेळेचे पालन करणारी, भक्तीभावाने जगणारी, क्रिकेटची आवड असणारी, नेहमी साडी नेसणारी लतादीदी म्हणजे भारतच्या ‘संगीताचा श्वास’ होती.

त्यांचा आवाज नायिकेच्या रूपात जीव ओततो, भावनांना आकार देतो, संगीताला ध्यान देतो आणि सदैव काळाच्या पलीकडे पोहोचतो. आजही त्यांचे प्रत्येक गीत म्हणजे सुरांचा साक्षात देवाचा स्पर्श. अशा या दैवी आवाज असलेल्या गानकोकिळेस शत् शत प्रणाम.

®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (१२/१२/२५)

1,324 Comments

  1. खुप छान लिहिलं आहे. सगळ्यांच्या लाडक्या लता दीदींबद्दल

  2. Equilibrado de piezas
    El equilibrado representa una fase clave en las tareas de mantenimiento de maquinaria agricola, asi como en la fabricacion de ejes, volantes, rotores y armaduras de motores electricos. El desequilibrio genera vibraciones que incrementan el desgaste de los rodamientos, generan sobrecalentamiento e incluso pueden causar la rotura de los componentes. Para evitar fallos mecanicos, es fundamental identificar y corregir el desequilibrio de forma temprana utilizando tecnicas modernas de diagnostico.

    Principales metodos de equilibrado
    Existen varias tecnicas para corregir el desequilibrio, dependiendo del tipo de componente y la intensidad de las vibraciones:

    El equilibrado dinamico – Se utiliza en componentes rotativos (rotores y ejes) y se realiza en maquinas equilibradoras especializadas.

    Equilibrado estatico – Se emplea en volantes, ruedas y piezas similares donde basta con compensar el peso en un solo plano.

    Correccion del desequilibrio – Se lleva a cabo mediante:

    Taladrado (eliminacion de material en la zona mas pesada),

    Colocacion de contrapesos (en ruedas, aros de volantes),

    Ajuste de masas de equilibrado (como en el caso de los ciguenales).

    Diagnostico del desequilibrio: equipos utilizados
    Para detectar con precision las vibraciones y el desequilibrio, se emplean:

    Maquinas equilibradoras – Miden el nivel de vibracion y determinan con exactitud los puntos de correccion.

    Analizadores de vibraciones – Registran el espectro de oscilaciones, detectando no solo el desequilibrio, sino tambien fallos adicionales (por ejemplo, el desgaste de rodamientos).

    Sistemas laser – Se emplean para mediciones de alta precision en componentes criticos.

    Especial atencion merecen las velocidades criticas de rotacion – condiciones en las que la vibracion se incrementa de forma significativa debido a fenomenos de resonancia. Un equilibrado correcto previene danos en el equipo en estas condiciones de funcionamiento.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!