#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#ब्लॉगलेखनटास्क (८/१२/२५)
@everyone
………आभासी दुनिया…….
जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ह्या उक्तीचा प्रत्यय रामायण महाभारत या महाकाव्यातूनही आपल्याला आला आहे . रामायणामध्ये जेव्हा सीतामाईने सोनेरी मृग बघितला तेव्हा ती आकर्षित झाली आणि तिने प्रभू रामचंद्रांना तो मृग धरून आणण्यास सांगितला .प्रत्यक्षात तो मृग म्हणजे मारीच राक्षस होता.. त्यानंतरच सीतेचे हरण, राम रावण युद्ध झालं.
तसंच महाभारतामध्येही पांडवांनी इंद्रप्रस्थ मध्ये मय सभेची निर्मिती केली होती आणि दुर्योधन जेव्हा त्या सभेमध्ये जातो तेव्हा त्याला फरशी आणि पाण्याची ओळखच पटत नाही. तो फरशी समजून एका तलावात पडतो त्याच्यामुळे भीम आणि इतर सेवकही त्याला हसतात आणि त्या अपमानानेच नंतर द्रौपदी वस्त्रहरण, कौरव-पांडव युद्ध होऊन पुढच महाभारत घडत ..
आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र महापराक्रमी संभाजी राजे यांना देखील फितुरीमुळे किती दगा फटका सहन करावा लागला आहे.
आताच्याच काळात तसा कोणीच नेता विश्वासाला पात्र नाहीये पण तरी आपण एखादा नेता त्याचा पक्ष आणि त्याची निशाणी हे जरी लक्षात ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी तो नेता त्या पक्षात राहिलच असे नाही ही पण एक प्रकारची जनतेची फसवणूकच नाही का ?
आज समाजात बघतो की ज्या मुलाच आई वडिलांशिवाय पान ही हलत नव्हत ,किती विश्वास आई वडिलांचा त्यांच्या मुलावर पण शेवटी त्या आई वडिलांच्या नशिबी वृद्धाश्रमचा आश्रय येतो ..लग्नाच्या वेळीही पूर्ण पारदर्शकता दोन्ही बाजूंनी न ठेवल्याने ,खोटीच माहिती एकमेकांना पुरवल्याने समाजात घटस्फोट प्रमाणही वाढत चालले आहे ..
मनोरंजन दुनिया आणि प्रत्यक्ष जीवन ह्यात तर खूपच फरक आहे त्यामुळे त्या आभासी दुनियेवर विश्वास ठेवून आपली फसवणूक न करणच चांगल ..
शेवटी प्रत्येकाने दिसतं तस नेहमीच नसतं म्हणून आपली फसवणूक होऊ नये ह्यासाठी ह्या आभासी दुनियेत सावध राहणे केव्हाही चांगले ..
दिसलं ते खरं की भास
दुनिया फसवी,आभासी
रहा डोळस ,कर पारख
सावध प्रत्येक पावलासी
सौ स्वाती येवले


Super
Seeing 8kbetbb pop up quite a bit. Promotions look interesting – are the wagering requirements a killer though? Always the catch! 8kbetbb