#माझ्यातलीमी
#कथालेखनटास्क (८/१२/२५)
#लघुकथा
#दिसतं_तसं_नसतं
दिलेले वाक्य : दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
………… दिसतं तसं नसतं……..
अंजली एक गरीब मुलगी होती. गावातून शहरात आलेली. शिक्षणासाठी.. कारण गावात फक्त दहावीपर्यंतच शाळा होती. मुलीने शिकून खूप मोठ व्हावं अशी तिच्या आई वडिलांना वाटायचं. पण शहरात राहायचं तर खर्च होणार.. तो कसा परवडणार..!? मग अंजलीनेच तोडगा काढला शिकता शिकता कामही करणार.
शहरात ती मामाकडे राहू लागली. मनाचीही आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. मामाचा मुलगाही तिच्याच वर्गात होता. कॉलेज, घरची कामे आणि सोबतच तिने लहान मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. गरीब घरातील असल्याने तिचं राहणीमान खूप साधं होतं. त्यामुळे कॉलेज मधे सारे तिच्याबद्दल काहीही बोलायचे. कशी दिसते, किती साधी राहते, काकूबाई दिसते, अभ्यास तरी करते की नाही काय माहित.. हिला काहीच येत नसणार .. असा म्हणत तिची टिंगल टवाळीही करायचे. तिचा मामेभाऊ तिची बाजू घ्यायचा तर त्यांनी त्याच्याशी बोलणही बंद केलं. तिला कॉलेज मध्ये मित्र मैत्रिणीही मिळाल्या नाही. सुरुवातीचे काही महिने तिला खूप त्रास सहन करावा लागला.
आता कॉलेज चे स्नेहसंमेलन आले. वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गायन स्पर्धा, विविध खेळ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम. अंजलीने सगळ्या स्पर्धेत भाग घेतला. तिची डी. एन. ए. प्रतिकृती प्रथम ठरली, रांगोळीत ही तिला पहिले बक्षीस मिळाले. गायन स्पर्धेत दुसरी आली, हस्ताक्षर मधे ही तिच्याइतके सुंदर आणि शुद्धलेखन कुणाचेच नव्हते. असे अनेक पारितोषिकं तिला मिळली.
आता मात्र सगळ्या मुली, मुलं तिच्याशी मैत्री करायला आले. छुपी रुस्तम निघाली असं सारे म्हणू लागले. तेव्हा तिच्या मामेभावाने त्यांना उत्तर दिलं… तुम्ही आधीच तिच्याशी मैत्री केली असती तर तिच्यातले गुण तुम्हाला कळले असते आणि त्याचा तुम्हालाही फायदा झाला असता, पण तुम्ही तिच्या दिसण्यावर गेलात. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे कायम लक्षात ठेवा.
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (९/१२/२५)


Super9t9 is a hidden gem! I’ve been enjoying it quite a bit. Give super9t9 a shot, you might be surprised.