#माझ्यातलीमी
#ब्लॉगलेखनटास्क (०८/१२/२०२५)
#लघुकथा
#जस दिसत तसं नसतं
#दिखावा
ऋतुजा आणि श्रुती एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या. ह्यावर्षी श्रुतीने ऋतुजाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती. श्रुतीचे ब्रँडेड कपडे, तिचा क्लासी चॉइस, तिच्याकडे असलेला महागडा फोन, इम्पोर्टेड मेकअप किट, तिचे मोठमोठ्या कार्समधून कॉलेजला येणे एकंदरितच श्रुतीच्या श्रीमंतीमुळे ऋतुजा भारावून गेली होती.
श्रुती नेहमीच आपल्या घरकुल बंगल्याविषयी, तिच्या पपांच्या बिझनेस विषयी कॉलेजमध्ये बढाया मारायची. रोज तिचे नवनवीन फोटो अपलोड करायची. या सगळ्यामुळे ऋतुजाला स्वतःचीच लाज वाटायची. आपण का नाही अशा श्रीमंत घरात जन्माला आलो या विचाराने ती हळहळायची.
घरकुल बंगल्याचे, त्यासमोरील बागेचे फोटो पाहून ऋतुजाची उत्सुकता ताणली गेली होती. तिने श्रुतीकडे तिच्या घरी यायची, बंगला बघायची इच्छा बोलून दाखवली.
“अगं मी राहते तो विश्रांतवाडी परिसर कॉलेजपासून खूप दूर आहे. फुरसतमध्ये जाऊ कधीतरी.” कारण देत श्रुती नेहमी टाळाटाळ करायची.
एक दिवस अचानक सरप्राइज द्यायच्या विचाराने फोन न करता श्रुतीच्या घरी पोहोचलेल्या ऋतुजाला खरी हकीकत कळली आणि तिकडे गेल्यावर ती स्वतःच सरप्राइज झाली.
श्रुती रहात असलेला घरकुल बंगला त्यांचा नव्हताच. त्याचे खरे मालक होते अजय सरपोतदार. श्रुतीचे वडील बंगल्याची देखरेख, बागकाम करायचे, आई साफसफाई, स्वयंपाकचं बघायची. काका सरपोतदार साहेबांचे ड्रायव्हर होते त्यामुळे श्रुतीला बऱ्याचदा कॉलेजला गाडीतून सोडायचे. साहेबांची मुलगी श्रुतीच्याच वयाची असल्याने तिचे कपडे, चप्पलबूट तिला वापरायला मिळायचे. गेली अनेक वर्ष बंगल्याच्या मागे असलेल्या आऊटहाउसमध्ये श्रुतीचे कुटुंब रहात असल्यामुळे कागदोपत्री सगळीकडे घरकुल बंगला असाच पत्ता होता. सरपोतदार कुटुंबीय सुट्टीत इकडे यायचे ते नसताना श्रुतीची फॅमिली बिनधास्त बंगला वापरायची त्यामुळे अनेकांना हा बंगला त्यांचाच आहे असे वाटायचे. श्रीमंतीचा दिखावा करत श्रुती याला खतपाणी घालायची.
श्रुती ऋतुजाशी खोटं बोलली हे कळल्यावर ऋतुजाला धक्का बसला. जस दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं याचा प्रत्यय आला. यापुढे खोट्या दिखाव्याला भुलायचं नाही, पैसा बघून मैत्री करायची नाही असा निर्धार करत ती जड अंतःकरणाने घरी परतली.
©®मृणाल महेश शिंपी.
09.12. 2025
शब्दसंख्या – 265


G333 es una buena opción si quieres variar tus juegos y entrarle a nuevas experiencias. He tenido buenas rachas aquí. Checa lo que tienen en g333.
Visit My website – I can’t believe I just learned this today. Thanks!
My name Card – A very impressive and informative piece of writing.
My Blog – This was exactly what I needed—perfect timing!
Click Me – I wish I found this earlier!
View Blog – I appreciate the real-world relevance you added here.
Click This – Your blog is becoming my go-to source for information.