#माझ्यातलीमी #ब्लाॅगलेखनटास्क (८/१२/२५)

#माझ्यातलीमी
#ब्लाॅगलेखनटास्क(८/१२/२५)
#कथालेखन
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत.
काय बोलतेस! किताब खुली आणि दोन गजरे कुणी दिले गं! अगदी छुपा रुस्तम निघालीस की? एवढं सगळं इथपर्यंत पोहोचलं, पण तू मात्र ताकास तुर लागू दिली नाहीस.
“ऐ बाई गं, तसलं काहीच नाही. हो, हे गजरे काल संध्याकाळी आणलेत. मी छोटीशी गोडुली विकत होती. मला दया आली म्हणून घेतले.”
मला माझं लहानपण आठवलं. काय मजेत गेलं माझं बालपण! कसलीच चिंता-काळजी नव्हती मला. मोठं होऊन उदास झालो, पण आता मात्र वाटतं की मोठं होऊन काय मिळवलं? सगळं मिळवलं – पद, पैसा, प्रतिष्ठा. माझ्या मर्जीनं लग्नही केलं.
पण आता मात्र हे असं महिला हॉस्टेलला पाहाव्या लागेल अशी वेळ आली आहे. अर्थात, हे सुद्धा काही वाईट नाही; पण कधीकधी विचार येतोच ना – काय बघून मी त्याच्या वर भाळलं गं? रूप तर त्याच्या पेक्षा मी चंद्रनक्षत्रात सारखी देखणी आहे, असं घरातले आणि बाहेरचे सांगायचे. आजही सांगतात. माझ्या हिम्मतीने मी एवढं चांगलं शिक्षण घेतलं.
पण तो एक क्षण – वादविवाद स्पर्धा – आणि त्यात त्यांनी मला जिंकली. आय मीन, मी हरले, पण मी त्याच्या प्रेमात पडले. सर्व काही पणाला लावून मी त्याच्याशी लग्न केलं. आणि त्यांनी काय केलं तर एक वर्षात वंश देऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर… सरळ त्याच्या आईच्या सांगण्यावरून दुसरं लग्न करायला तयार. कसा गुडघ्याला बाशिंग च बांधून तयार होता!
मला सरळ म्हणाला, “गं, तू मला घटस्फोट दे किंवा दुसऱ्या लग्नासाठी मोठ्या मनाने परवानगी दे!”
खरंतर सांगते, त्यावेळी मला आई-बाबांचे बोल आठवले – “दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत.” जर त्यावेळी या वाक्याचा अर्थ कळला असता, तर आज ही वेळ आलीच नसती ना!
शब्द संख्या २५४
#०९_१२_२०२५_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!