# माझ्यातली मी
# लघुकथा लेखन
दि. 7 डिसेंबर 25
विषय……जस दिसत तस नसत म्हणून जग फसत

आज सकाळी सुरभीला बाजूच्या घरात कुणीतरी नविन कुटुंब राहायला आलेले दिसले . छान सोबत होईल या विचाराने ती खुष झाली. संध्याकाळी बाजूची दोघे बाहेर जातांना दिसली .छान जोडी होती. सुंदर होती ती पण तो जास्तच रुबाबदार होता.दोन तिन दिवसात ओळख करुनच घेवूया म्हणत ती कामाला वळली.
सुरभीला कामावरुन घरी यायला संध्याकाळ व्हायची त्याच वेळी ते दोघे बाहेर जातांना दिसायचे .ती अगदी व्यवस्थित तयार झालेली असायची.अशा चुकामुकीमूळे ओळख करायची राहतच होती .अगदी रविवारी सुद्धा ते घरी नसायचे. आता मात्र सुरभीला त्या दोघांचा हेवा वाटायला लागला होता. विशेषकरुन तिच्या टापटिप राहणीमानाचा आपल्या घरगुती अवताराशी नकळत सुरभी तुलना करत असे.
आज सायंकाळी एका लग्नाला जायचे म्हणून तिने सुट्टी घेतली होती. मनोज घरी आल्यावर ते दोघे निघणार होते. दुपारी जरा खालच्या पार्लर मधून केस तरी सेट करुन घेवूया म्हणत ती बाहेर निघाली. तेवढयात बाजूच्या घरातून मोठयाने कुणीतरी मारल्याचा व खाली पडल्याचा आवाज आला .ती थबकली ..पाठोपाठ कानावर शब्द आले…नाटकं करतेस काय..म्हणे तब्येत ठिक नाही… श्रीमंत कस्टमर आहे आज,त्याला काय वापस पाठवू ,सहा वाजता मेकअप करुन तयार राहा.वरुन अश्लील शिवी देत तो बाहेर पडला ऐकुन सुरभी अवाक झाली पण क्षणातच तिच्या वस्तुस्थिती लक्षात आली .
पार्लर जायचे सोडून ती पटकन बाजुच्या घरात शिरली , पाहतो तर काय ती खाली पडलेली ,डोक भितींवर आपटलेल,ओठ सुजलेला सुरभीने तिला हात देऊन उठवले ,पाणी दिल तिच्या पाठीवरुन हात फिरवता तिला रडू कोसळले . सुरभीच्या प्रेमळ वागणुकीने ती बोलती झाली.
माझ नाव रेवती व आता गेला तो माझा नवराच आहे राकेश . काॅलेज मध्ये असतांना त्याच्या रुपावर भाळून प्रेमात पडले..मला वडील नाहीत आई अन एक लहान बहिण आहे. माझी खूप मोठी फसवणूक झाली. राकेश एक दलाल आहे त्याने मला चक्क धंदयाला बसवले. नाही म्हटले तर तुझ्या बहिणीला पण धेवून येईल,आईला सर्व सांगेल अशी धमकी देतो . मी पुरती अडकले ,तुला मैत्रिण समजून सांगावेसे वाटले.
एव्हाना सुरभी सर्व काही समजून चुकली होती की …जस दिसते तस नसते म्हणूनच जग फसते .
सुरभीने रेवतीचा हात पकडला व बोलली आताच चल आपण पोलीस मध्ये तक्रार देऊ घाबरु नको मी सर्व साभांळून घेईल कारण माझा भाऊच इथे पोलीस इन्स्पेक्टर आहे. तुझी यातून नक्की सुटका होईल.

विनया देशमुख

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!