# माझ्यातली मी
# लघुकथा
विषय… दिलेली ओळ

बोलता न येणाऱ्या शब्दांच ओझ खूप मोठ असत.

पश्चाताप

आज जवळपास एक महिन्या नतंर अभिजीत देसाई बिझनेस टूरवरुन घरी येतात. कृष्णाई त्यांची मुलगी नेहमीप्रमाणे घरी नसते .तिची आई अरुधंती गेल्यापासून ती काहीशी वडीलांपासून दूरच जाते.बिझनेस मध्ये पैसे कमावयाच्या मागे त्यांनी आपल्या आईच्या आजाराकडे दुर्लक्ष केले अशी तिची समजुत होते.
आज कृष्णाई घरी येताच तिच्या साठी पुन्हा एक आश्चर्य तयार असते.वडीलांसोबत तिच्या पेक्षा फारतर तिन ,चार वर्षींनी मोठी अशी मुलगी सोबत असते. ही तुझी नवीन आई…सुलभा अशी ते तिची ओळख करून देतात. या नवीन नात्याने वडील व मुलीच्या नात्यात पुन्हा दूरावा वाढतो. नवीन आई शी पण तिला फारसे जमवून घेता येत नाही. सुलभा मात्र नावाप्रमाणे साधी सरळ असते ती आपणहून कृष्णाई सोबत संवाद साधायचा प्रयत्न करते.
अशातच कृष्णाई चा बि.ई. चा रिझल्ट येतो पुढे शिक्षणासाठी ती सोलापूर वरुन मुबंई ला जाण्याचा निर्णय घेते. मुबंई ला जाण्यापूर्वी वडीलांना तिच्याशी बोलायचे असते, पण ती काहीही न बोलता निघून जाते. तिच्या होस्टेल ला वडीलांचे पत्र येते पण तिच्या मनात वडीलांचा इतका राग येतो की ते पत्र न उघडता फाडून टाकते
एक दिवस अचानक अभिजीत देसाई ंचा हदयविकाराने मृत्यू होतो. तिला त्यांच्या कंपनीच्या मॅनेजर कडून समजते तरीसुद्धा आता येऊन काय करु असे म्हणत ती त्यांनाच सर्व कारभार पाहायला सांगते.़
एक दिवस अचानक सुलभा एक छोटीशी सुटकेस घेवून दरवाज्यात हजर होते. ती नाईलाजाने स्वागत करते आता सुलभा ची प्रकृती पण खालावलेली असते.दोन दिवसांनी रात्री अचानक सुलभा ची प्रकृती खालावते.त्या रात्री सुलभा तिला जबरदस्ती ने जवळ बसवते.
कृष्णाई , इथे बस आणी शांतपणे ऐक.
मी इथवर प्रकृती ठीक नसतांना आले.मला तुला काहीतरी महत्वाचे बोलायच आहे
ऐक मी तुझ्या बाबांचे कायदेशीर सल्ला देणारे वकील श्रीरंग पटवर्धन यांची मुलगी आहे. मला ब्लड कॅन्सर असून फार थोडे दिवसांची सोबत आहे. माझ्या वडीलांचा एक्सीडेंट झाला असता मला साभांळण्याचे वचन तुझ्या बाबांनी दिले होते.पण एका तरुण मुलीला घरात तसेच कसे ठेवणार व मला या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून समाजाला दाखवायला खोटे सांगीतले.तुला खरे सांगणार होते पण तू त्यांचे ऐकले नाही व पुढे देवाने त्यांना संधी दिली नाही.
कृष्णाई अवाक होऊन ऐकतच राहिली वडीलांसोबत न बोललेल्या शब्दांच ओझ तिला आता सहन होत नव्हत. आता तू तरी मला सोडून जाऊ नकोस म्हणून तिने सुलभाला घट्ट मिठी मारली.

विनया देशमुख

679 Comments

  1. आम्ही दोघी मराठी सिनेमा ची कथा अशीच आहे

  2. Yo, been messin’ with jl1 lately and gotta say, it’s got some potential. Needs a bit of polish, but keep an eye on it! Check it out here: jl1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!