#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क(१/१२/२५)
#बोलता_न_येणाऱ्याला_शब्दाचं_ओझ_खूप_जास्त_असतं
#शीर्षक_शब्दांचं ओझं
बोलता न येणाऱ्याला शब्दांचं ओझं जास्त असतं. सुबोधच्या मनात हे वाक्य नेहमी घुसायचे. संध्याकाळची चहाची वेळ झालीच होती. वाफाळलेला चहा घेताना, नेत्राने सुबोधला एकदाचं विचारले. “चला, संध्याकाळी आपली प्रतिक्रिया द्यायची आहे. हो किंवा नाही?”
सुबोधचं मन गोंधळलं. अधीरा – ती नक्षत्रासारखी चमकणारी, सोनाक्षी डोळ्यांची. कुठल्याही बाबतीत कमी नाही. पण लग्न? तो बोलू शकत नाही की…
“काय रे सु…बोध, कशी आहे ना ती?” नेत्राने हसत विचारलं.
मनात: “अरे ब्रो… अधीरा सोनाक्षी…”
“चुप… चुप…” सुबोधने तोंडावर बोट ठेवलं.
शेवटी नेत्राने ओरडलं, “अरे तू काय मुखदुर्बल आहेस का? एवढी वर्षं झाली, तू फक्त मनात बोलतोस. मी आई म्हणून मला कळतं तुझ्या मनातल, पण तुझ्या होणाऱ्या बायकोला कशी कळवणार तुझी ही मौनातींल भाषा? प्रयत्न कर ना! नाहीतर कायम एकटा राहशील. लग्नानंतर तिच्याशी बोलल्याशिवाय चालेल का? तुझ्या मौनाचा ती काय अर्थ काढेल?”
सुबोधच्या डोळ्यात अश्रू दाटले. “आई! माझी काय चूक होती? बाबांनी माझं तोंड बघणं सोडलं. मी समोर आलो की हिणवलं. घरात चौघंच होतो ना? तरी बोर्डिंगला टाकलं. तिथे रॅगिंग झाली, पण तुम्ही विचारलाही नाही. तेव्हापासून मी बंद झालो. आता बोलावं म्हणजे कसं?”
नेत्राने सुबोधला मिठी मारली. “बाबा, तो भूतकाळ होता. तू प्रयत्न कर. अधीराला सांग, तुझं मौनच प्रेमाची भाषा आहे. ती समजून घेईल तुला!.”
त्या रात्री सुबोधने फोन उचलला. “अधीरा… मी… सुबोध.” मला तू आवडतेस, मला भेटायचे तुला हे शब्द बाहेर पडले. ओझं हलकं झालं. नेत्रा हसली – मौन संपलं, प्रेम सुरू झालं.
(#शब्द: २५२_२८०)
#०१_१२_२०२५_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!