#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#लघुकथालेखनटास्क (१/१/२५)
@everyone
दिलेल्या वाक्या वरून कथा :
दिलेले वाक्य : “बोलता न येणाऱ्या शब्दाचं ओझं खूप जास्त असतं..”
रजनी आता एम. एस. सी. च्या शेवटल्या वर्षाला होती. लहानपणापासून तिने शाळेत आणि कॉलेज मधेही आपला पहिला क्रमांक सोडला नाही. एवढंच नाही तर ती इतर अँक्टिव्हिटीस आणि खेळातही तरबेज होती. आई वडील दोघेही डॉक्टर आणि ही त्यांची एकुलती एक मुलगी. दोघांनाही तिचा सार्थ अभिमान होता. पण तिच्यात एकच कमी होती आणि ती म्हणजे तिचं रूप..! निग्रो वाटेल इतकी ती काळी होती, त्यात नाकिडोळी सुध्दा कुरूप होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांना एकाच गोष्टीची चिंता होती.. तिच्या लग्नाची..!
सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज असलेल्या इतक्या गुणी मुलीला कोणी पसंत करेल का? लग्नाच्या बाजारात तर सुंदरतेलाच जास्त महत्व असतं.. मन आणि बुद्धी तिथे नगण्य असते. त्यात आईवडील दोघेही डॉक्टर असल्याने घरी सगळ्या कामांसाठी नौकर.. त्यामुळे घरातील कुठल्याही कामाची सवय नाही. समाज कितीही पुढे गेला तरीही लग्नाच्या बाबतीत मुलीला काय काय कामं येतात हेच विचारण्यात येतं. तिच्या बाबतील प्रेमविवाह देखील शक्य नाही .. कारण तेच .. तिचं दिसणं. याची रजनीला देखील कल्पना होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
तिच्याच वर्गात असलेल्या पंकज बरोबर असलेली मैत्री आता प्रेमात रूपांतरित झाली. एम. एस. सी. झाल्यानंतर तिने पी. एच. डी. साठी प्रयत्न केले. तिला हव्या असलेल्या मार्गदर्शनाखाली तिला पी. एच. डी. साठी प्रवेश मिळाला. पंकज मात्र नोकरीसाठी प्रयत्न करू लागला. त्याची सुद्धा पी. एच. डी. करण्याची इच्छा होती पण दोघांनाही आता लग्न करायचे होते, त्यामुळे त्याने आपली इच्छा दाबून टाकली. तोही तिच्याइतकाच हुशार होता.
दिवस पुढे जात होते. नोकरी मिळत नव्हती. तिच्या कॉलेज मध्ये सगळ्यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं होतं. त्यातच एका प्रसंगी दोघे एकत्र आले, त्यातून नको ते घडलं. तिला पी. एच. डी. सोडावी लागली. तिचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. आपलीच चूक त्याला कोणी काय करणार..? त्यामुळे तिच्या मनात कित्येकदा यायचं, “का हा पंकज आपल्या आयुष्यात आला असेल? नसता आला तर एक वेळ मी अविवाहित राहिले असते. पण कॅन्सर सारख्या आजारावर संशोधन करून अनेकांचं आयुष्य वाचवता आलं असतं..” पण हे ती कुणालाच सांगू शकत नव्हती. कारण काही शब्द असे असतात की ते बोलता येत नाही आणि त्याचं ओझं खूप जास्त असतं.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१/१२/२५)
शब्दसंख्या : ३१७


छान कथा
Man, 345betapp is a decent app! Easy to use, deposit is quick, and withdrawals are pretty fast compared to some other places I’ve tried. Definitely worth a look. 345betapp