#वीकेंडटास्क- लघुकथा लेखन

वाक्य :- “बोलता न येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त असतं”.

लघुकथा :- शीर्षक, ” शेवटचा स्पर्श”

शहरातील एका नामांकित रुग्णालयात नुकत्याच रात्रपाळीच्या नर्सेस यायला लागल्या होत्या. आय. सी. यु चा मंद प्रकाशात नर्स अनन्या थकलेली जाणवली. आज तिची डबल ड्युटी होती ना!

बेड क्रमांक 12 मध्ये देशपांडे काका होते. त्यांचा श्वास मंदावलेला, आवाज थकलेला, पण डोळे मात्र बोलके. मुलांच्या भेटीसाठी आसुसलेले. त्यांची तगमग अनन्याला स्पष्ट दिसत होती.

काकांच्या दोन्ही मुलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे रोज पैशाच्या वादात अडकलेले, खर्चाचा ताण त्यामुळे अस्वस्थ वाटली. पैशांची जुळवाजुळव करण्यात मुलं गुंतली. काका एकटे पडले. अनन्या त्यांच्या जवळ येऊन बसली म्हणाली,” काका! बोलता न येणाऱ्या शब्दांचे ओझं खूप जास्त असतं ना! तुम्हाला काही सांगायचं असेल तर हळूच हात दाबा”.

काकांचे तळवे थरथरले, त्यांच्या स्पर्शात एकच विनंती होती. मुलांनी मला जिवंतपणे एकदा तरी जवळ घ्यावं, बास!”अनन्याने ते ओळखले व धावत, धावत जाऊन मुलांना आय .सी.यू मध्ये बोलावलं. डॉक्टर अधिराज उपचार करीत होते. पण वेळ हातातून निसटून जात असल्याचं जाणवलं.

मुलं आत आले तेव्हा अनन्याने त्यांच्या हातात काकांचे हात ठेवले. मुलांनी काकांच्या कपाळावर हात ठेवला. सुरकुतलेल्या काकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्यांनी थरथरत्या बोटांनी मुलांच्या गालाला स्पर्श केला. त्याच क्षणी काकांच्या डोळ्यातून घळाघळा वाहणारे अश्रू सर्वकाही बोलून दाखवत होते, म्हणत होते- रुसवा नाही फक्त अपार प्रेम!.

काही श्वासानंतर काका शांत झाले.
मुलं रडू लागली.
डॉक्टर अधिराज अनन्याकडे पाहून म्हणाले,” कधी कधी उपचार औषधात नसतात – मायेच्या शब्दात आणि शेवटच्या स्पर्शात असतात”.
त्या रात्री आय सी यु मध्ये एक जीव गेला.
पण एक ओझं मात्र अखेर हलकं झालं……..!

शब्द संख्या – २२५.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

One comment

  1. nnbet4? Alright, so I hopped on and played a few rounds. The selection is ok and the games loaded quickly, which is always a plus! It’s worth checking out if you’re looking for something new. More info here: nnbet4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!