सांगायचे असून सांगितले नाही……

# लघु कथा लेखन (१/१२/२५)
# बोलता न येणार्या शब्दाचं ओझं खूप जास्त असतं, हे वाक्य वापरून लघु कथा.

सांगायचे असून सांगितले नाही ….

शेजारचे सावंत काका गेल्या पासून वीणा खूप अस्वस्थ होती. त्यांनी किती तरी गोष्टी तिला अशा सांगितल्या होत्या की, त्या तिला सोडून कोणालाच अगदी त्यांच्या घरातल्या कोणालाच माहिती नव्हत्या. व त्या सर्व काका गेल्यावरही कोणलाही कळू द्यायच्या नव्हत्या.

काका नोकरी निमित्त बाहेर गावी असायचे. ते कोल्हापूरला असताना, शेजारची मंदा त्यांना दोन्ही वेळचा जेवणाचा डबा द्यायची. तिचा नवरा अपघातात गेला. पदरी दोन मुलं होती. ती जेवणाचे डबे करून द्यायची व चार घरच्या पोळ्या पण करायची. काका ऑफीसला गेले की, भा़डी घासायची व त्यांचे कपडे पण धुवायची. झाडूपोझा करून घर आवरून ठेवायची. या सर्व कामाचे काका तिला पैसे द्यायचे. खरंतर दोघांत कसलेही संबंध नव्हते पण काका माणूसकीच्या नात्याने तिला मदत करत होते. तिच्या मुलीच्या लग्नात पण काकांनी तिला मदत केली होती. मुलगा बांधकामा वर वाॅचमनचे काम करत होता.

एके दिवशी तो पाचव्या मजल्यावरून पडला व त्याचे दोन्ही पाय गेले. मंदाला त्यामुळे खूप मोठा धक्का बसला व तिला हार्ट अटॅक आला. मरताना तिला काकांनी त्या मुलाचा सांभाळ करायचे वचन दिले होते. त्याला एका अनाथाश्रमात ठेवले होते व दर महिन्याला ते पैसे देत होते. अधूनमधून त्याला जाऊन भेटतही होते.

त्यांची बायको सुलभा अतिशय संशयी स्वभावाची होती म्हणून सांगायची इच्छा असूनही त्यांनी हे तिला सांगितले नाही. ते वीणाला म्हणाले, बोलता न येणाऱ्या शब्दाचं ओझं खूप जास्त असतं, ते मी इतके दिवस सांभाळले. ते मी आता तुझ्या खांद्यांवर देतो. तू मला मुली सारखीच आहेस. त्यांनी स्वतःच्या एका बॅंकेच्या खात्यात तिचे नाव ऍड करून घेतले होते. माझ्या मृत्यूनंतर त्या मुला साठी नियमित तो जीवंत असे पर्यंत पैसे द्यायचे हि जवाबदारी मी तुला देतो. प्लिज नाही म्हणून नकोस. तसेच हि गोष्ट कोणालाही सांगू नकोस असे वचन पण घेतले होते.

शब्द संख्या : २८५

One comment

  1. Gave fa880 a go. A pretty solid option once you get past the registration. But the lack of options and promos made it just a so-so type of experience. If they change that, it would be great!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!