लक्ष्मीच्या पाऊलांनी रिमेक

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क
#रिमेकऑफसिरीयल.
@everyone

लक्ष्मीच्या पावलांनी रिमेक

पात्र … अद्वैत चांदेकर , कला खरे , कॉन्सिलर, आजोबा , आई ,रोहिणी , कलाची बहीण नयना आणि काजल , अद्वैत चा भाऊ राहुल आणि सोहम , अनामिका सोहम ची बायको .

एपिसोड १

अद्वैत :—- कौन्सिलर साहेब, एक प्रॉब्लेम झाला आहे .. जी अती आगाऊ आहे ना तिचं काय कराव ते कळत नाही ..

कौन्सिलर :— पण त्या तर कॉन्फरन्स साठी दिल्ली ला गेल्या आहेत ना ?

अद्वैत :—- दिल्लीला गेली आहे पण सतत ती दिसत असते मला, कधी स्वप्नात काय दिसते तर कधी वाटतं की समोरच आहे माझ्या .. काय करावं मला कळतच नाही ..असं का होतं ?

कौन्सिलर :—अहो हे असं होतंय कारण एक तर तुमचं त्यांच्यावरती प्रेम बसलय नाहीतर तुम्ही त्यांचा खूप तिरस्कार करताय.. दोघांपैकी एकच शक्यता आहे …

अद्वैत :—- तिरस्कार कदाचित असेल.. मी तिचा तिरस्कार करत असेल .. चला मी निघतो मला मिळाल बहुतेक माझ्या प्रश्नाचे उत्तर ..
( घरी येतो ..मग पुन्हा स्वतःशीच खरंच मी तिरस्कार करतो का खरेचा ? )

अद्वैत :—- आजोबा , मला तुम्हाला काहीतरी विचारायच आहे .. मला तुम्ही सांगा कधी आजी जेव्हा कुठे बाहेर जायची तेव्हा तुम्हाला सतत आजी दिसायची का ?

आजोबा ( हसतात ) : —-, व्हायचं ना मला तसं ? का रे का असं विचारतोय ?

अद्वैत :– कारण ती खरे ती गेली आहे ना तेव्हापासून मला पण असंच जाणवत आहे ..सतत दिसत असते इकडे तिकडे.. अस का आजोबा ?

आजोबा :— ( आजोबा हसून) अरे याचा अर्थ तू तुझ्या मनाला विचार ..तू एक काम कर तू शांत पणाने तुझे डोळे मिट .. आणि तुझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे त्याचा तू विचार कर बर..

अद्वैत —- ठीक आहे , करतो मी तसं ( डोळे मिटतो )आणि दिसते ती भांडकुदळ खरे ..जेव्हा केव्हा माझ्याशी भांडत असते ती खरे ती कशी दिसली मला ?

आजोबा :— अद्वैत , मिळालं ना तुझ्या प्रश्नाचे उत्तर ..

अद्वैत अजून गोंधळून जातो…

अद्वैत —- ( गोंधळून )आई, मला एक सांग ..माझा खूप गोंधळ उडाला आहे , मला जरा मदत करशील का ?

आई : — काय झालं ? तुझी तब्येत ठीक आहे ना ?

अद्वैत —- खरे दिल्लीला गेली आहे पण मला सारखी सारखी तीच दिसते .याला काय म्हणायचं ?

आई :—- ( हसते ) अरे , ती लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली .. तुमचं लग्न अगदी वेगळ्या स्थितीत झालेल.. तुला खरं म्हणजे आवडत होती ती कला ची बहिण नयना .. पण नयना आणि राहुल दोघांनी मिळून धोका दिला आपल्याला ,नयना चक्क लग्ना च्याच दिवशी राहुल बरोबर पळून गेली ..आणि त्याच्यामुळे लग्नाच्या दिवशी गोंधळ होऊ नये म्हणून आजोबांच्या सांगण्यावरून आणि तिच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून , तुमच्या दोघांचं लग्न झालं… लग्नानंतर ती मलाही सुरुवातीला आवडत नव्हती… पण लग्नानंतर प्रत्येक प्रसंगात तिने हे सिद्ध केले आहे की ती तुझी चांगली जोडीदार आहे .. आता सून म्हणून मी तिचा स्वीकार केलेला आहे ..मलाही ती आता या घरात हवीशी आहे … त्याच्यामुळे तुला जे वाटतंय ना तिच्याबद्दल ते प्रेमच आहे .. आता तू , ती जेव्हा येईल ना दिल्लीवरून तेव्हा तिच्याशी हे बोलावं..

अद्वैत — हो, आई नक्की …

एपिसोड २

अद्वैत ला असं वाटत असतं की कधी एकदा त्याची खरे येते आणि तो प्रेमाची कबुली तिला देतो .. अद्वैत ठरवतो की जर खरेशी पुन्हा लग्न केलं तर , तिला किती आनंद होईल ,कारण आता मी तिच्याशी मनापासून लग्न करणार आहे ..मी तिला पुन्हा लग्न करशील का विचारीन ..

कला खरे अद्वैत ची बायको तिची ही तीच अवस्था असते ती ही तिच्या चांदेकर च्या प्रेमात पडलेली असते .. तिला ही वाटत असत पुन्हा त्याच्याशी लग्न करावं..

खरे येणार त्या दिवशी अद्वैत छान रूम सजवतो ..

कला :— व्वा, चांदोबा , तू किती छान रूम सजवली?
अद्वैत:— कोण आहे मी ? द ग्रेट अद्वैत चांदेकर ..
कला :—( खूप हसते) .. द ग्रेट अद्वैत चांदेकर मी खूप मिस केलं तुम्हाला दिल्लीला .. मला तुला काही सांगायचं आहे ..
अद्वैत —- मला ही तुला काही सांगायचं…
( आधी मी ,आधी मी सांगणार म्हणून दोघे आगाऊ, अती आगाऊ एकमेकांशी भांडतात
मग दोघे एका वेळेला बोलतात ) .. आपण पुन्हा लग्न करूया ..

दोघेजण पुन्हा लग्न करायच ठरवतात आणि त्याच दरम्यान तिला लक्षात येतं की अद्वैत ची आत्या रोहिणी , तिचा मुलगा राहुल हे दोघेजण अद्वैतला आणि चांदेकर कुटुंबाला फसवत आहेत .. ती ते अद्वैत ला सांगायचं ठरवते , पण …..

एपिसोड ३

रोहिणी आणि राहुल हे दोघेजण मिळून तिचा अपघात करतात … तिचा अपघात झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तिची क्रिटिकल सर्जरी होते तेव्हा अद्वैतला अजून कळतं की तो तिच्याशिवाय जगू शकत नाही तो देवाला प्रार्थना करतो ..कला बरी होते ..आणि मग ती रोहिणी आणि त्या राहुलने केलेला सगळं कारस्थान अद्वैतला सांगते .. अद्वैतला कळतं की त्याची आत्या आणि तो राहुलच हे दोघेजण त्यांचे खरे शत्रू आहे .. शेवटी आजोबा आणि पूर्ण चांदेकर फॅमिली हे रोहिणी, राहुल ,नयना ला पोलिसांच्या ताब्यात देतात … त्याच्यानंतर अद्वैतचं आणि कलाच पुन्हा एकदा लग्न होतं ..

लग्नात कलाला समजत की अनामिका ही राहुल ,रोहिणी ला सामील होती आणि तिच्या दीराच आयुष्य खराब करायला आली आहे .. तेव्हा ती अनामिका ला ही घटस्फोटाचे पेपर्स देऊन हाकलून देते ..
अद्वैत कला च्या लग्नानंतर लगेच सोहम , कलाची बहीण काजल चा साखरपुडा होतो ..

सौ स्वाती येवले.

10 Comments

  1. J9bet – Has anyone had a positive experience cashing out? I’ve read a few conflicting reports. I’d love to try it, but super nervous about slow withdrawals. j9bet

  2. Продажа тяговых https://faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

  3. Продажа тяговых https://ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  4. Продажа тяговых ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  5. Продажа тяговых faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!