#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क

#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क(२८/११/२५)
#ब्लाॅग_लेखन
#रिमेक_ऑफ_सिरियल
#विण_दोघातली_ही_तुटेनां
#पात्रे
राजवाडे कुटुंब: समर, अधीरा, आजी, अनिका (अधीऱ्याची मोठी बहीण).
काकी मलिका: तिची तीन मुलं (सुष्मिता, रोहन, स्वानंदी).
सरपोतदार कुटुंब: बाबा, स्वानंदी, रोहन, सुष्मिता.
मित्र आणि मैत्रीण: आनंद.
#एपिसोड_१_पहिला_राजवाडे_आणि_सरपोतदार_लग्न समारंभ
#स्थळ: गोवा बीच (सिन चित्रिकरण: दोन पावला)
(दृश्य: समुद्रकिनारी सजावट, संगीत आणि लग्नाची तयारी. बाबा, रोहन आणि स्वानंदी एका खोलीत बोलत आहेत.)
बाबा: नंदू, आता उद्या तू राजवाडे होणार आहेस!
रोहन: ताई, खरंच तू या लग्नाला मनापासून तयार आहेस ना?
बाबा: खरं आहे नंदू, तुझ्या मनात अजून जर काही ‘किंतु-परंतु’ असेल, तर आपण थोडा वेळ मागून घेऊन स्थगित करू का?
स्वानंदी: बाबा! आता कशाला वेळ लावायचा? आपली सर्व तयारी झाली आहे. आता फक्त सोहळा सुखरूपपणे संपला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये. सर्व काही आनंदाने साजरा व्हावे.
रोहन: (हसत) बाबा, बघताय ना? ताईला नवऱ्याकडे जाण्याची किती घाई झाली आहे!
बाबा: (भावुक होऊन) जा मुली, जा! दिल्या घरात तू सुखी राहा! पण हो, या गरीब बिचाऱ्या बाबाला विसरू नकोस. (रुमाल काढून डोळे आणि घाम पुसतो.)
स्वानंदी: (भावुक) रोहन, काय रे? माझ्या बाबाला रडवू नकोस! बाबा, मी कुठे दूर जाते मी? बघ, बाबा, नको करू का लग्न?
(रूमच्या दरवाजावर टकटक होते.)
स्वानंदी: कोण ये? आत ये ना! आई, काय झालं? सुस (सुष्मिता) नाही का इथे?
आई: सुष्मिता तिकडे…
रोहन: काय झालं? बोल ना आई!
आई: स्वानंदी, रोहन आणि सुष्मिताचे बाबा, सुष्मिताने काही तरी पेय प्यायलं आहे. ती खाली काही वेगळंच वागत आहे.
स्वानंदी: अरे बापरे! रोहन, बाबा, आता काय करायचं?
बाबा: आधी खाली तर जाऊ या. मग बघू काय करायचं.
(खोलीतून बाहेर पडतात. समोर दृश्य पाहून सर्वजण घाबरून जातात. सुष्मिता हेलपाटत एका मोठ्या खुर्चीवर चढलेली असते. समर जिजू तिच्या जवळ आहे.)
सुष्मिता: (उच्च स्वरात) माझी ताई खूप छान जेवण करते! तिची काही चूक नाही ते… मी आणि आई…
स्वानंदी: शु… शू… हं बाळा, आता आपण आपल्या खोलीत जाऊन उद्या बोलू हं.
(सर्वजण हळूच समरला मदत करतात. राजवाडे चार हात सुष्मिताच्या हातातून सोडवतात.)
सुष्मिता: (आजीचा हात धरते आणि खुर्चीवरून खाली उडी मारते. तोंडावर बोट ठेवते) आजी, माझ्या ताईला रागावू नका. ही मजा आहे… माझी आणि आईची!
आजी: कोणती मजा? हे जे प्यालं आहे ती?
सुष्मिता: ही नाही… काही ती दुसरी मजा… पं… धं… रा…
स्वानंदी: बाळा, चल आपण खोलीत जाऊन बोलू.
(एपिसोड संपतो. सस्पेन्स संगीत वाजते.)
#एपिसोड_२_दुसरा_लग्नाच्या_विधीची_सुरुवात
(दृश्य: सकाळ. लग्नाचे विधी सुरू झालेले. सनईचे सुर वाजत आहेत. स्वानंदी, रोहन (बहिण-भाऊ) आणि समर, अधीरा (बहिण-भाऊ) नवरा-नवरीच्या पोशाखात मंडपात येतात.)
भटजी: सर्व तयारी पाहिल्यानंतर आणि सगळं व्यवस्थित आहे असं म्हणून लग्नविधींना सुरुवात करतो.
(तेवढ्यात राजवाड्यांचा सोनार येतो. हातात मोठा बॉक्स.)
आजी: तुम्ही इथे? गोव्यात काय करताय?
सोनार: सरांनी मला पाठवलं आहे. त्या दिवशी तुमच्या घरून एक बाई आल्या होत्या. त्यांनी तुमच्या कडचा हार, बांगड्या असा संपूर्ण सेट आमच्या दुकानात गहाण ठेवण्यासाठी आणला होता. तो सेट तुमचा होता म्हणून न बघता आम्ही ठेवून घेतला आणि वीस लाख रुपये दिले. पण आता तो सेट खोटा आहे असा फोन आला आणि तो सेट घेऊन या पत्त्यावर या, असं सांगितलं. म्हणून मी इथे आलो.
आजी: तुम्हाला खात्री आहे की तो सेट खरंच खोटा आहे का? कोण बाई आल्या होत्या? त्यांचा तुमच्याकडे फोटो आहे का?
सोनार: आजी, तो सेट खोटा नाही, खरंच आहे. हा बघा हा सेट! पण त्या फोन करणाऱ्या माणसाने सांगितलं की तो सेट खोटा आहे. सांगा, इथून बाहेर पडायचं आणि तो सेट बाहेरच्या डस्टबिनमध्ये ठेवून जायचं. पाठी वळून सुद्धा पाहायचं नाही.
आजी: ज्या बाई तो सेट घेऊन आल्या होत्या, त्यांना तुम्ही इथे असल्या तर ओळखाल का? मला फक्त इथून त्या दाखवा.
सोनार: हो, नक्कीच ओळखू शकतो. (नेमकी त्याच वेळी मलिका समोरून येत असते आणि तिच्या मागे स्वानंदीची आई उभी असते. सोनार बोट दाखवतो.) त्या… बघ त्या!
आजी: मलिका! (मलिका जवळ येते.) काय हवं आहे काय तुम्हाला?
मलिका: तुम्ही इथे कसे? आता आलाच आहात तर थांबा. लग्नाला हो!
सोनार: ही नाही, त्या तिकडे आहेत. त्या गुलाबी रंगाच्या साडीत नेसलेल्या आहेत त्या!
मलिका: ती अधीराची मोठी बहीण अनिका! तिचं काय काम तुमच्याकडे?
आजी: अनिका! इकडे ये!
सोनार: आजी, त्या नाही. त्यांच्या पलीकडे आहे ते ना? त्या…
आजी: स्वानंदीची आई!
सोनार: हो, त्याच त्या बाई! त्या दिवशी पेढ्यात आल्या होत्या.
(आजी स्वानंदीच्या आईला बोलावते आणि विचारते.)
आजी: तुम्ही हा आम्ही दिलेला सेट घेऊन पेढ्यात गेलात होतात?
स्वानंदीची आई: हो, मी गेले होते पेढ्यात. पण मी काय केलं?
आजी: तुम्ही सेट गहाण ठेवून वीस लाख रुपये रोख घेतले का?
स्वानंदीची आई: हो, मी घेतले पैसे.
आजी: मग आता तो सेट खोटा आहे म्हणून सांगून परत घेऊन इथे येण्यासाठी तुम्हीच फोन केला होता का?
स्वानंदीची आई: नाही हो, मला यांचा फोन नंबर पण माहिती नाही. आणि एकदा पैसे घेतले, मग परत कशाला त्यांना फोन करून बोलावून घेऊन ना?
(एपिसोड संपतो. तणावपूर्ण संगीत.)
#एपिसोड_३_तिसरा_विरोध_आणि_संशय
(दृश्य: मंडपाबाहेर. समर, स्वानंदी, रोहन, अधीरा, सरपोतदार साहेब सर्वजण एकत्र येतात. ज्वेलरीच्या प्रकरणाने वातावरण तणावपूर्ण आहे. अनिका रागावलेली दिसते.)
अनिका: आता आणखी काय उरलंय का करायचं? समर दादा, अधीरा, तुम्ही दोघे तरी या लग्नाला नकार द्या ना! अधीरा, तू काय पाहिलंस गं? या रोहनमध्ये ना तो आपल्या कुठल्या बाजूने मॅच होतो? कुठल्या तरी आयटी कंपनीत नोकरीला आहे. महिन्याला एक लाख देईल जेमतेम कमावत असेल. तुझ्या पूर्ण महिनाभराचा खर्च कधी बघितलास का? हे मिडल क्लास मेटालिटीचे लोक! तुला सुखाने राहू देतील का?
अधीरा: (दुहेरीपणे) दीदी, पण… मी रोहनला आवडते. त्याची साधीपणा, कुटुंबप्रेम… हे सगळं मला खूप आवडतं. पैशाची गरज नाही, प्रेमाची आहे!
समर: अनिका, तू जास्तच बोललीस. हे लग्न आमचं निर्णय आहे. ज्वेलरीचं प्रकरण वेगळं, पण लग्न थांबवू नका. स्वानंदीची आईचं स्पष्टीकरण ऐकूया.
रोहन: (रागावून) अनिका ताई, तू काय म्हणतेस? आम्ही गरीब आहोत, पण हृदयाने श्रीमंत! अधीराला मी सुखी ठेवेन, हे वचन!
स्वानंदी: (आईकडे बघून) आई, तू खरंच काय केलंस? आजींना सांग ना सत्य!
स्वानंदीची आई: (रडत) मी… मी फक्त कुटुंबासाठी केलं. पैशाची गरज होती. सेट खरा आहे, मी काय करेन? तो फोन कोणी केला, मला माहीत नाही!
आजी: (समरला) हे प्रकरण सोडवू. पण लग्न चालू ठेवा. विघ्न येऊ देऊ नका.
(सर्वजण मंडपात परततात. विधी सुरू होतात, पण अनिकेच्या डोळ्यात शंका दिसते. एपिसोड संपतो. प्रश्न उभे राहतात: कोणी फोन केला?)
#एपिसोड_४_चौथा: गृहप्रवेश आणि समाधान
(दृश्य: लग्न संपले. गोव्याहून मुंबईत परत. राजवाडे घरात गृहप्रवेश. सजावट, उंबरठ्यावर तांदूळाने भरलेले सुंदर माप आरती तबक आणि आनंदाचा वातावरण. स्वानंदी आणि समर नव विवाहित जोडप म्हणून येतात.)
आजी: (आरती आणायला सांगते) ये स्वानंदी, तुझ्या म्हणजे आपल्या घरात. तुझं आणि समर चे हे नवं जीवन सुरू होवू दे सुखाने!
स्वानंदी: (समरला बघून) हे घर आता माझंही आहे. आई, तुझी चूक क्षमा कर, पण उद्या सत्य सांग.
मलिका: (सुष्मिताला बघून) सुस, तुझी रात्र विसरलीस का? आता सगळं आनंदात राहा.
(अनिका बाजूला उभी. तिच्या फोनवर एक मेसेज येतो – “सेट खोटा नव्हता, मीच फोन केला होतो. क्षमा करा.” अनिका रडते.)
अनिका: (सर्वांना सांगून) मी… मीच फोन केला होता. सोनारला. मला स्वानंदी च्या आईला बदनाम करायचं होतं, कारण मला वाटलं स्वानंदी मुळे रोहन बरोबर अधीरा लग्न करतेय. पण आता कळलं, प्रेम पैशापेक्षा मोठं आहे. माफ करा!
स्वानंदीची आई: (अनिकाला मिठी मारून) बाळा, कुटुंबात विश्वासच सगळं आहे. आता सेट परत मिळवा आणि नव्या सुरुवातीला येऊ द्या.
रोहन: (अधीरा ला) तू माझी स्वीट हार्ट आहेस. दोघांची वीण तुटेना, नेहमी एक!
अधीरा: हो रोहन, ही तुटेना!
(सर्वजण एकत्र हसतात. गृहप्रवेशाची होतो. एपिसोड संपतो. हॅपी एंड संगीत. टायटल: “वीणा दोघांची ही तुटेना – रिमेक”.)

#२९_११_२०२५_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!