# माझ्यातली मी
# लघुकथा लेखन
दि. 27 आक्टोंबर 25
दिलेल्या ओळी
सौदंर्य सर्वांना आवडत। कुणाला चेहऱ्याच…तर कुणाला …विचाराच
दुरंगी दुनिया
आज तिच्या साठी अत्यंत आनंदाचा दिवस होता. परदेशात एका भव्य फिल्म महोत्सवात ती भारतात प्रतिनिधीत्व करणार होती .भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या वृत्तपत्रांनी तिच्या नावाअगोदर Black Beauty, Black Charming lady अशी बिरुद लावली होती.
आलिशान हॉटेल च्या राजेशाही खोलीमध्ये बसून हे सर्व वाचत असतानां तिने डोळे मिटले अन तिच्या न कळत मन भुतकाळात घिरट्या मारायला लागल. फक्त अठरा वर्षाची होती ती …बारावी पास …पित्याच छत्र हरवलं. गृहिणी असलेली आई अन दोन लहान भावंड यांची जबाबदारी आली. वडिलांच्या पेन्शन वर पोट भरणार होत. …बाकी काय? . खरतर तिला लहानपणापासून सिनेमाच आकर्षण होत… आवाज पण दमदार होता…एकपाठी होती ती. प्रथम तिने लहानमोठी काम करण्याचा प्रयत्न केला मात्र मोबदला अत्यंत अल्प…शेवटी तिने तिच्या एका सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या एका नातेवाईकाच्या आधाराने त्या मोहमयी दुनियेत प्रवेश मिळवला. अनेक उबंरठे झिजवले पण ळ प्रत्येक ठिकाणी तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करुन ….तिच्या काळया रंगावरुन तिचा अपमान करण्यात आला तिच्यातल्या उत्तमांकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करुन फक्त गोऱ्यापान अशा कचकडयाच्या बाहुल्यांना कामे मिळत होती.
शेवटी तिने शुटींग दरम्यान स्पॉट वर चहापानी देण्याचे काम स्विकारले. हिऱ्याची पारख करायला जोहरीच लागतो . एक दिवस एका अनुभवी,कुशल तसेच मनमिळावू प्रोड्युसरच्या लक्षात तिची हुशारी आली…अन तिच्या नशिबाने भरारी घेतली ….खूप मेहनत घेवून तिने मिळालेल्या प्रत्येक कामाच सोन केल .प्रामाणिक पणे काम करुन तिने फिल्मी दुनियेत एक आदराचे व मानाचे स्थान मिळवले . जो काळा रंग तिच्या अपमानास्पद वागणुकीसाठी कारणीभूत होता …त्यानेच आज तिला सौदंर्य तारका ठरवले होते .
भानावर येत तिच्या मनात विचार आला..सलाम या जगाला …ज्याने एकाच तिची अशी दोन रुपे दाखवून दिली.😉😉
विनया देशमुख
शब्द संख्या… 205
्