#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#लघुकथाटास्क (२७/१०/२५)
@everyone
**जोडीदार**
हॉस्पिटल मधून परतल्यावर गुलाबाचे फुल देताना पवन नीलाला म्हणाला माझ्या नजरेत तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही,विश्रांती घे,परवा आपलं लग्न आधी ठरविल्याप्रमाणे होईल.ती लाजली,तितक्यात आरशाकडे तिचं लक्ष गेल आणि जोरात किंचाळून तिने तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत झाकून घेतला.
त्या अग्नितांडवात ,तिच्या मनातला मांडव कोलमडून पडला.
मोठ्या आकांताने रडत ती म्हणत होती दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू.
पवनने तिला मिठीत घेतलं,आणि म्हणाला माझं तुझ्यावरच प्रेम एक टक्काही कमी नाही झालं, माझ्यासाठी तू आजही तितकीच सुंदर आहे जितकी पूर्वी होती कारण मी प्रेम केलं ते तुझे विचार,आचार ,संस्कार ह्यांवर .मेडिकल सायन्स खूप प्रगत आहे त्यामुळे आपण योग्य उपचार घेऊ आणि तुझा चेहरा पूर्वीसारखा करू.
नीला म्हणते मग आपण लग्न पुढे ढकलूया .
पवन तिला समजावतो की अग किती नकारात्मक विचार करशील.
नकारात्मकता माणसाला अधिकाधिक दुःख देते असं तूच नेहमी म्हणते ना तुझ्यामुळे माझा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन सकारात्मक झाला.नीलामुळे आमचा उडाणटप्पू मुलगा सुधारला,आयुष्यात जगण्याचा अर्थ,मार्ग त्याला कळला असे माझे आईवडील म्हणतात.त्यामुळे तू असा विचार नको करुस.झाले गेले विसरून जा.
नीला म्हणते कसं विसरू,माझा फक्त चेहरा खराब झाला नाही तर माझ्या हृदयात कधीच न भरणारी जखम झाली आहे जी नेहमीच ठसठसत राहील.
त्यामुळेच लग्न करून मला त्यावर समजदारीच मलम लावून तुझं मन आनंदात रमवायचं आहे मग आपोआपच आपलं जीवनगीत सुमधुर होईल अस पवन म्हणतो.
नीलाच्या डोळ्यात पाणी येत, ती म्हणते पवन तू अगदी माझ्यासारखाच बोलायला लागला.
नीला, कारण तुझ्या सुंदर विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली
दोन दिवसांनी पवन नीलाच लग्न होत आणि तिच्या उपचारांनाही सुरवात होते.कठीण प्रसंगातही साथ देणारा प्रेमळ जोडीदार मिळाला म्हणून नीला देवाचे मनोमन आभार मानते.
सौ स्वाती येवले.
शब्दसंख्या ..250

