#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क(२७/१०/२०२५)
#वैचारिक_सौंदर्य
#स्वप्नीलकळ्या🥀
विषय:—सौंदर्य… सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्याचं… काहींना विचारांचं…
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सुजाताच्या काॅलेजमध्यें सुयश हा अविवाहित,तरूण प्रोफेसर. रहाणी अतिशय साधी व दिसायलाही सर्वसामान्य. काही विद्यार्थी त्याची टर उडवायचे.
पण वर्गात शिकवतांना मात्र त्याची उच्च विचारसरणी व वैचारिक सौंदर्य सगळ्यांनाच जाणवायचे.
शेवटच्या वर्षाला असलेली मोहक चेहऱ्याची सुजाता स्वतः सुंदर असूनही सुयशच्या विचारांकडे खूप आकर्षित झाली.
त्याच्या वैचारिक सौंदर्याच्या प्रेमात तर पडलीच पण नकळत तिला तो मनापासून आवडायला ही लागला.
तिच्या बोलण्यातून सतत सुयशचे कौतुक- तारीफ होत असल्याने मित्रमैत्रिणींना ही गोष्ट लक्षांत आली व त्यांना फारशी रूचली नाही.
पण जेव्हा तिच्या आईवडिलांच्या हे लक्षांत आले. तेव्हा त्यांनी तिला सरळच विचारले की बेटा, तुझे काय म्हणणे आहे? तिने आईबाबांना स्पष्टच सांगितले की, “आईबाबा, मला त्या सरांचे विचार फारच आवडतात.आमचे विचार खूप जुळतात.
” अशा सुंदर विचारांचा व जीवनाविषयी विशाल दृष्टिकोन असणारा जीवनसाथी जर मला मिळाला तर माझ्याइतकी नशिबवान दुसरी कोणीच नसेल!”
“जीवनसाथीची निवड करताना त्याचे वरवरचे बाह्यसौंदर्य बघण्यापेक्षा वैचारिक व आंतरिक सौंदर्य बघणे मला जास्त महत्वाचे वाटते कारण ते श्वाश्वत असते.”
आईवडील तिच्या लग्नाचा विचार करतच होते.त्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने
सुयशच्या आईवडिलांना व त्याला भेटायचे ठरवले.आपल्या लेकीच्या बोलण्यात तथ्य असेल ह्याची त्यांनाही कोठेतरी मनातून खात्री वाटत होती.
प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर सुयशचे मार्दव पूर्ण वागणे-बोलणे,त्याची बुद्धिमत्ता व विचारांतील ठामपणा त्यांनाही प्रथम भेटीतच लक्षात आला. मी असा दिसायला सर्वसामान्य आणि आपली मुलगी इतकी सुंदर! असाही त्याने आईबाबांना प्रश्न केला.
पण आमच्या मुलीचीच इच्छा आहे असे सांगताच तो ही त्यादृष्टीने तिला भेटायला तयार झाला.
आई- बाबांना दोन- चार भेटीतच मुलीची निवड योग्यच आहे ह्याचा प्रत्यय आला. दोघांच्या संमतीने आनंदात विवाह सोहळा पार पडला व पुढे आयुष्यभर सुजाता व सुयशचा संसार वैचारिक समानतेमुळे व सौंदर्यपूर्ण विचारांमुळे सफल झाला.
(२५० शब्द)
© ® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀

