छडीने लागे छम छम विद्या ये घमघम असं नेहमी ऐकलं असेल.लहानपणी शिक्षक वर्गात प्रवेश करत असताना त्यांच्या हातात मोठी छडी असायची.विद्यार्थि नेहमी त्या छडीने घाबरायचे.छडीच्या भीतीने ते अभ्यास पूर्ण करायचे शाळेतही नेहमी व वेळेवर यायचे.
कॉलेजचा पहिला दिवस होता क्लास टीचर यांनी वर्गत प्रवेश केला त्यांना गुड मॉर्निंग करून कॉलेजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली परंतु त्यांच्या हातात कुठलाही प्रकारची छडी नव्हती.विचार केला सर किती चांगले आहे सर कधी छडी ही आणत नाही म्हणजे आम्हाला कधी मारणार ही नाही.म्हणून आम्ही चार पाच मैत्रिणी आम्ही कॉलेजच्या लेक्चर ब़क केला.शिक्षकांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे शिक्षा दिली नाही आम्ही काही दिवसांनी पुन्हा तेच केले.शिक्षकांनी आम्हा चार-पाच विद्यार्थिनींना उभा करून खूप खूप रागवली खूप काही वाईटही बोलले त्यानंतर आम्ही पुन्हा अशी चूक केली नाही.
काही दिवसांनी शिक्षकांनी समजावले.ती कॉलेजला आल्यावर छडीच्या प्रयोग का होत नाही शिक्षकांनी आम्हाला विचारले तुमचे आई किंवा वडील तुम्हाला .मारतात का एका विद्यार्थ्याने उत्तर दिले सर आता मी काय लहान राहिलो का मार खायला.
शिक्षक म्हणाले हो तसंच आहे तुम्ही आता .लहान नाही आहात लहान असताना तुम्ही छडीला घाबरायचे कारण ती छडी खूप जोरात लागायची त्या भीतीने तुम्ही शिका अभ्यास व्यवस्थित पूर्ण करायची व्यवस्थित शाळेतही यायचे.त्या छडीमुळे कारण मार खायची भीती वाटतेकारण मार खायची भीती वाटते जोरात लागायची ना हातावरती छडी.
परंतु जसे तुम्ही कॉलेजला येता मोठे होता ती छडी तुम्हाला लागत नाही . मारलं थोडा वेळ थोडा वेळच तुम्हाला त्रास होईल मग तुम्ही विसरून जाणार परंतु जसे तुम्ही मोठे होतात तुम्हाला शिक्षा म्हणून तुमच्या शरीरावर नाही तुमच्या मनावर प्रहार केला जातो.मी परवा तुम्हाला खूप काही वाईट बोललो त्यामुळे ती चुकी पुन्हा तुम्ही केली नाही.तेही विन छडीमुळे ते काम पूर्ण झालं कारण जसं जसं तुम्ही मोठे होतात तसेच तुम्हाला भावना समजतात अपमान समजतो.सगळ्यांसमोर आपले शिक्षक आपला किती वाईट बोलतात आपल्या मनालाही गोष्ट वाईट वाटते म्हणून आपण पुन्हा ती चुकी कधीच करत नाही. कारण या वयात शरीराला झालेली दुखापत ही लवकर बरी होते पण मनाला झालेल्या दुखा नेहमी लक्षात राहतात….
🙏🙏🙏🙏
