……..बंध मैत्रीचे……

# माझ्यातली मी #
**** लघुकथा लेखन टास्क ****
खाली वाक्यांवरून एक लघुकथा लिहा..
खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारखं असतं
ते कितीही जुनं झालं
तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही…
………. बंध मैत्रीचे……..
विश्वास व रमेश दोघे जिवश्चकंठश्च मित्र. दोघांची आसनगाव येथे घरे होती. रमेश अविवाहित. विश्वासचे लग्न याच गावात झाले. सुरुवातीला नोकरी येथेच होती. कालांतराने बदली शहरात झाली.
मुले झाली. व्याप वाढला. आपल्या घराची जबाबदारी पार पाडत असतांनाच त्याच्या कानावर कोणीतरी तुमचं घर बळकावत आहे अशी बातमी आली. आपण कितीही चांगले असलो तरी शत्रुत्व हे आपोआपच तयार होतं. मग ते घरातलं सुद्धा असू शकतं. अचानक विश्वास आजारी पडला. अर्धवट शुद्धीत असतानाच रमेशला सांगून भेटायला येणारा ओळखीचा गृहस्थ घराच्या कागदपत्रावरती सह्या घेतो व रमेशनीच घर विकलं असं जाहीर करतो.
विश्वास शुद्धीवर आल्यावर त्याला ही बातमी कळते. त्याचा विश्वास बसत नाही पण सही करून घेतांनाचा रमेशचा फोटो त्या ओळखीच्या गृहस्थाने काढून तो फोटो दाखवून हे सत्य असल्याच दर्शवितो. काही काळांपुरती दुरावा येतो. रमेश हा काही झालं तरी आपल्या मैत्रीला डाग लागू देणार नाही हा त्याच्या प्रेमातल्या विश्वासाचा धागा असतो. त्याचं मन खात होतं. आपण रमेशवर आळआणून चूक तर करत नाही.

कालांतराने कळते की रमेशला सरबतातून मद्य पाजून आपल्याच भाच्याने त्याच्याकडून कागदावर सह्या घेतल्या कारण त्याचा डोळा आपल्या घरावर आहेच हे त्याला माहीत होतेच.

बरे झाल्यावर विश्वास आसनगावला जाऊन माझ्याकडून खूप मोठी चूक झाल्याचे रमेशला सांगतो व माफीची याचना करतो. रमेश त्याचे दोन्ही हात पकडून डोळ्यात पाणी आणून नुसतीच मान डोलवतो
विश्वास म्हणतो,
मित्रा पुरावाच असा माझ्यासमोर आणला. विश्वास सुद्धा बसत नव्हता व मनही मानत नव्हतं
रमेश म्हणाला,
विश्वास आपल्या दोघांचं मैत्रीचं नातं एका चांगल्या पुस्तकासारखंच आहे. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीच बदलणार नाहीत.
जे आपण काही दिवस एकमेकांपासून दुरावलो होतो, तो दुरावा आपल्या घरचा काही वेळापूर्तीचा पाहुणा होता.
विश्वासने रमेशला कडकडून मिठी मारली.
….. शब्द संख्या २५२…..
…… अंजली आमलेकर…… २४/१०/२५

error: Content is protected !!